मुंबई : आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल. 


बर्फाचा शेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाचा दुखत असल्यास बर्फाने शेकवा. बर्फाच्या थंडाव्यामुळे पेशीत निर्माण झालेला ताण, त्रास कमी होण्यास मदत होते. परिणाम दुखणाऱ्या टाचांपासून आराम मिळतो. त्यासाठी १५ मिनिटे बर्फाने शेकवा.


तेलाची मालिश


टाचांचे दुखणे कमी करण्यासाठी तेलाची मालिश हा उत्तम उपाय आहे. यामुळे दुखण्यावर लगेचच आराम मिळतो. मसाज केल्याने मसल्स रिलॉक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यासाठी खोबरेल तेल, मोहरीचे तेल इत्यादीने टाचांना मसाज करा. दिवसातून ३ वेळा १०-१० मिनिटे मसाज केल्याने दुखण्यावर आराम मिळतो आणि सूजही कमी होते.


हळदीचा प्रयोग


हळदी औषधी आणि बहुगुणी असते. हळदीतील कर्क्युमिन तत्वामुळे दुखणे, सुज यापासून आराम मिळतो. त्यासाठी एक ग्लास दूधात अर्धा चमचा हळद घालून ५ मिनिटे मंद आचेवर गरम करा. नंतर दुधात एक चमचा मध घाला आणि प्या. टाचांचेच नाही तर शरीरातील इतर भागातील दुखण्यापासून आराम देण्यासही मदत होते.


मीठ आणि पाणी


तळवे, टाचांचे दुखणे दूर करण्यासाठी मीठाचे पाणीही उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे जाडे मीठ घाला. ते नसल्यास बारीक मीठ वापरले तरी चालेल. त्यानंतर त्या पाण्यात १५-२० मिनिटे पाय बुडवून ठेवा. दुखण्यावर आराम मिळेल. त्यानंतर साध्या पाण्याने पाय धुवा व त्यावर मॉईश्चराईजर लावा.