ओपन पोर्सची समस्या दूर करतील हे `३` घरगुती उपाय!
आजकाल ओपन पोर्सची समस्या सामान्य झाली आहे.
मुंबई : नितळ, तजेलदार त्वचा कोणाला नको असते. पण धूळ, प्रदूषण, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे चेहऱ्यावरील तेज गायब होऊ लागते. तसंच यामुळे ओपन पोर्सची समस्या उद्भवते. तेलकट त्वचा असणाऱ्यांना हा त्रास अधिक संभवतो. वयानुसार हे पोर्स देखील वाढू लागतात. त्यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते. तुम्हालाही या समस्येमुळे त्रस्त असाल तर हे काही घरगुती उपाय करुन पाहा...
केळं
केळं खाण्याचे तर अनेक फायदे तुम्हाला ठाऊक असतील. पण तुम्हाला माहित आहे का? की त्वचेसाठी देखील केळं खूप फायदेशीर आहे. केळ्यामुळे त्वचेतील डॅमेज टिश्यूज दूर होऊन त्वचा ग्लो होण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा केळं मॅश करुन लावल्याने त्वचेवरील ओपन पोर्सची समस्या दूर होण्यास मदत होते.
काकडी आणि लिंबू
ओपन पोर्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काकडी आणि लिंबाचा वापर तुम्ही करु शकता. यासाठी काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून लावा. असे नियमित केल्यास स्किन पोर्स टाईट होण्यास मदत होईल.
दूध आणि ओट्स
दूध आणि ओट्सचा पॅक बनवण्यासाठी २ चमचे ओट्समध्ये चमचाभर गुलाबपाणी आणि १ चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे ओपन पोर्सची समस्या तर दूर होईलच पण चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासही मदत होईल.