या ३ घरगुती उपायांनी दूर करा झोपत लाळ गळण्याची समस्या!
झोपत लाळ गळ्याची समस्या तुम्हीही त्रस्त आहात का?
मुंबई : जागे असण्याच्या तुलनेत झोपेत अधिक लाळ निर्माण होते. झोपेत आपण तोंडाने श्वास घेत असतो आणि त्यामुळेच झोपेत लाळ गळते. तर काही वेळेस खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून एलर्जी होते किंवा काही औषधांमुळे अधिक लाळ निर्माण होते. झोपत लाळ गळ्याची समस्या तुम्हालाही असेल तर हे घरगुती उपाय त्यावर कामी येतील.
तोंडातून लाळ गळत असल्यास पचनास खूप वेळ लागणारे अन्नपदार्थ खाण्यापासून दूर रहा. पोट साफ ठेवा. त्याचबरोबर लाळ गळण्याची समस्या असल्यास तुळशीची पाने चावा आणि थोडे पाणी प्या. दोन-तीन वेळा असे केल्याने लाळेपासून सुटका मिळेल.
रात्री झोपेत लाळ गळल्याने काहीसे लाजल्यासारखे वाटते तर मग फटकीच्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे लाळ गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
लाळ गळण्याच्या समस्येवर आवळा पावडर फायदेशीर ठरते. त्यासाठी जेवल्यानंतर लगेचच कोमट पाण्यात आवळा पावडर घालून प्यायल्याने नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर अॅसिडीटीपासूनही सुटका मिळेल.