हाताच्या साली निघत असल्यास `हे` घरगुती उपाय फायदेशीर ठरतील!
मानवी शरीरात त्वचेचे अनेक स्तर असतात.
नवी दिल्ली : मानवी शरीरात त्वचेचे अनेक स्तर असतात. अनेकदा त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात. तळहातावरची त्वचा निघण्याची समस्या तुमच्यापैकी कोणातरी असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या मंडळींमध्ये तुम्ही ती पाहिली असेल. यावर काही घरगुती उपाय... त्यामुळे नक्कीच फायदा होईल.
कोमट पाणी
कोमट पाण्यात काही वेळ हात बुडवून ठेवा. त्यामुळे हाताची त्वचा नरम पडेल व त्यानंतर ते स्वच्छ पुसून त्यावर मॉईश्चराइजर लावा. मॉईश्चराइजरने त्वचा हायट्रेड राहील.
ऑलिव्ह ऑईल
हाताच्या साली निघत असतील तर त्यावर ऑलिव्ह ऑईल अत्यंत फायदेशीर ठरेल. ऑलिव्ह ऑईल चांगले मॉईश्चराइजर असून ते नियमित लावल्यास ही समस्या हळूहळू दूर होईल.
भरपूर पाणी प्या
ही समस्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. त्यामुळे शरीर हायट्रेड राहील. परिणामी शरीराचे डिटॉक्सिकेशन देखील होईल.
दूध आणि काकडीचा वापर
हाताची साल निघत असल्यास त्यावर दूध आणि काकडीचा तुकड्याने मसाज करा. काकडीत पाण्याचा अंश अधिक असल्याने त्वचा मॉईश्चराइज होते. आणि दुधातील स्निग्धता त्वचेला तजेला, आर्द्रता देते.
प्रोटीनयुक्त आहार
तज्ञांनुसार टिश्यू तयार होण्यासाठी प्रोटीन्स महत्त्वाची भूमिका निभावतात. त्वचेच्या साली निघतात तेव्हा अनेक टिश्यू नष्ट होतात. त्यामुळे त्याचा पूर्ननिर्मितीसाठी आहारात प्रोटीन्सचा समावेश करा.