मुंबई : बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या अचानक उद्भवतात. त्यातील एक समस्या म्हणजे पोटदुखी. खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यामुळे पचनतंत्र बिघडते आणि पोटदुखीची समस्या बळावते. त्याचबरोबर इतर अनेक कारणांमुळे पोटदुखी होऊ शकते. पण वारंवार औषधे-गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक ठरते. म्हणून काही घरगुती उपायांनी तुम्ही पोटदुखीपासून सुटका मिळवू शकता. 


कोरफड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरफडीचा ज्यूस पोटासंबंधिच्या तक्रारी दूर करण्यास फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने आतडे साफ होते. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस पाण्यात मिसळून प्या. 


काळीमिरी


काळीमिरी आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते. काळीमिरी पावडरमध्ये हिंग, सुंठ आणि काळं मीठ घालून चूर्ण बनवा. पोटांच्या समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात हे चूर्ण मिसळून प्या. 


वेलची


पचनक्रिया सुरळीत करण्याचे काम वेलची करते. यासाठी जेवल्यानंतर वेलची वाटून मधात मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे पोटदुखीवर आराम मिळेल. 


मेथी


पोटदुखी दूर करण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात. एक छोटा चमचा मेथीचे दाणे हलकेसे भाजून गरम पाण्यासोबत घ्या. यामुळे गॅसेसची समस्या दूर होवून पोटदुखीवर आराम मिळेल.