मुंबई : जेव्हा दातांचा प्रश्न येतो तेव्हा आपण म्हणतो की दात हा शरिराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण दातांशिवाय तुम्ही जेवण करु शकणार नाहीत. अनेक गोष्टींना तुम्हाला नाही म्हणावं लागेल. अनेकांना दात दुखण्याची समस्या असते. अशावेळी काही घरगुती उपाय करुन देखील तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. लवंग : लवंग एक अशी नैसर्गिक वस्तू आहे. जी आपल्या दातांसाठी खूप लाभदायक आहे. लवंगमध्ये अनेक औषधी गुण असतात. जे दातांमधील बॅक्टेरिया आणि जर्म्सला संपवतात आणि दातांना मजबूत करतात. तुमची दाढ जर दुखत असेल कर लवंग यावर गुणकारी उपाय आहे. लवंगमुळे दातांचं दुखणं कमी होतं. पण याचा वापर तुम्ही नियमित केला पाहिजे.


2. मीठ : मीठ देखील तुमच्या दातांमधील दुखणं कमी करतं. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या पाहिजे. यामुळे तुमच्या दातांचं दुखणं कमी होतं.