मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. या आजारात समाजात खुलेपणाने बोललं जात नसल्याने त्याचा त्रास असाहनीय झाल्यावर शस्त्रक्रियेच्या मदतीने या त्रासातून सुटका करावी लागते. म्हणूनच मूळव्याधीचा त्रास धोकादायक होण्याआधीच काही घरगुती उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. 


मूळव्याधीवर घरगुती उपाय - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळव्याधीचा त्रास अत्यंत त्रासदायक टप्प्यावर असेल तर ग्लासभर दह्यामध्ये अर्धा चमचा इसबगोल पावडर मिसळा. हे मिश्रण रात्रीच्या वेळेस प्यायल्यास अधिक फायदा होतो. या उपायामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.  


मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावरदेखील नियंत्रण गरजेचे आहे. दिवसाची सुरूवात दही, ताक पिऊन केल्यास अधिक फायदा होतो. सकाळी उठल्यावर ब्रश करा. त्यानंतर दह्यांत काळं मीठ किंवा ओवा मिसळून त्याचे नियमित सेवन करावे. या उपायामुळे मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते.   आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या ! 


नियमित 15-20 दिवस हा उपाय केल्यास मूळव्याधीचा वेदनादायी त्रास कमी होण्यास मदत होईल. औषधाविना मूळव्यधीचा त्रास कमी करतील या '4' टीप्स