मुंबई : चामखीळीचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर पैपिल्लोमा वायरसमुळे पिगमेंट कोशिका एकत्र येतात. यामुळे त्वचेच्या वरच्या बाजूला  चामखीळ तयार होते. चामखींळीचा त्रास लहान सहान वाटत असला तरीही वेळीच त्याच्यावर उपचार न केल्यास तो अधिकच त्रासदायक होण्याची शक्यता असते. चामखीळ ही प्रामुख्याने काळ्या किंवा चॉकलेटी रंगाची असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चामखीळीचा त्रास आटोक्यात आणणयसाठी अनेक ब्युटी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. परंतू लहान स्वरूपात असतानाच त्वचेवर काही आयुर्वेदीक उपाय केल्यास चामखीळीचा त्रास कमी होऊ शकतो. 


केळ्याची साल -


केळ्याच्या सालीमध्ये ऑक्सिकरण कमी करण्याची क्षमता असते. ज्यामुळे चामखीळीचा त्रास कमी होतो. चामखीळीवर केळ्याची साल लावून ठेवा. रात्रभर हा उपाय केल्याने चामखीळीचा त्रास आटोक्यात येण्यास मदत होते. 


बटाटा - 


केळ्याप्रमाणेच बटाटादेखील चामखीळीचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतो. याकरिता बटाटा किसून त्याची पेस्ट चामखीळीवर लावा. यामुळे झटपट चामखीळ कमी होण्यास मदत होते. 


तूप 


चुन्यासोबत तूप समप्रमाणात मिसळा. हे मिश्रण चामखीळीवर लावा. यामुळे चामखीळीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. 


खास टीप - 


हे उपाय घरगुती असल्याने त्वचेवर त्याची पॅचाटेस्ट करा. त्वचा संवेदनशील असल्यास त्रास अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.