मुंबई : आपण अनेक प्रकारच्या डाळी आपल्या आहारातून खात असतो. मसूरच्या डाळीत फक्त प्रथिनेच आढळत नाहीत, तर त्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटकही आढळतात.  अनेकदा आपण मसूर अगोदरच विकत घेतो आणि साठवून ठेवतो आणि पण कालांतराने त्यात किडे लागल्याचं आपल्याला दिसतं. मसूर डाळीला लागलेले किडे दूर करण्‍यासाठी काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला मसूरच्या डाळीला किडे पडू नये म्हणून घरगुती उपाय सांगणार आहोत.


1. हळदीचा वापर करून मसूरला किड लागू नये म्हणून उपाय करु शकता. तुम्ही 20 किलो किंवा 30 किलो डाळ स्टोअर करुन ठेवत असाल तर त्यात चार ते पाच गुंठ्या हळद टाका. असे केल्याने डाळीला किड लागणार नाही.


2. तमालपत्र वापरून कीड दूर केली जावू शकते. मसूरमध्ये तमालपत्र टाका. असे केल्याने किड लागणार नाही. तुम्ही तमालपत्रासह लवंग देखील ठेवू शकता.


3. मोहरीच्या तेलाचा वापर करुन तुम्ही केसांचे मुळांपासून संरक्षणही होऊ शकते. अशा स्थितीत मसूरच्या डाळीत मोहरीचे तेल मिसळा आणि नंतर उन्हात वाळवा. असे केल्याने मसूरला किड लागणार नाही.


4. लसणाचा वापर करुन देखील तुम्ही मसूरच्या डाळीला किड लागण्यापासून वाचवू शकतात. लसणाच्या अख्ख्या कळ्या टाका आणि काही वेळ अशाच राहू द्या. लसणाच्या तीव्र वासापासून कीड लागणार नाही.