मुंबई : आहारात संतुलित जेवणाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैली, जेवणाच्या, झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आहारावर तुमचे सौंदर्य आणि त्वचेचा पोत अवलंबून असतो. मात्र संतुलित आहाराच्या अभावामुळे त्वचेवर डाग, पिंपल्स आणि ऑपन पोअर्सचा त्रास वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूणांमधील ऑपन पोअर्सच्या समस्येमुळे चेहरा खराब होतो. हळूहळू ही छिद्र मोठी होतात. त्यामुळे मेकअपही उत्तमप्रकारे त्वचेवर टिकत नाही. मग चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. 


ओपन पोअर्सचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय -  


1. साखर, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण  


2 टीस्पून साखर 
1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल 
1 टेबलस्पून लिंबाचा रस 


हे सारे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण नीट विरघळल्यानंतर चेहर्‍यावर किमान तीन मिनिटं लावा. मसाज केल्यानंतर 5 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा नीट धुवावा. हा उपाय आठवड्यातून किमान 2 वेळेस करणं आवश्यक आहे. 


2. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर -  


अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर अर्धा कप पाण्यामध्ये मिसळा. हे मिश्रण नीट एकत्र केल्यानंतर फ्रीजमध्ये आईस क्युबच्या पात्रामध्ये ठेवा. बर्फ तयार झाल्यानंतर तो किमान मिनिटाभरासाठी चेहर्‍यावर फिरवा. यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. हा प्रयोगही आठवड्यात दोनदा केल्याने त्वचेवरील ओपन पोअर्सचा त्रास कमी होईल.