मुंबई : होळी म्हटलं की रंग आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग आपण मनसोक्त रंगाचा आनंद घेतो. मात्र काही रंग इतके जिद्दी असतात की ते त्वचेवरून जाणे कठीण होते. अशावेळी मोठा प्रश्न असतो तो म्हणजे हे रंग शरीरावरून काढण्याचा. तर आता रंग काढण्यासाठी त्वचा जोरजोरात घासू नका. तर हे घरगुती उपाय करुन बघा.


बेसन, लिंबू आणि दूध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेसन, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करा. रंग असलेल्या त्वचेवर ही पेस्ट लावा. १५-२० मिनीट ती पेस्ट सुकू द्या आणि सुकल्यानंतर त्वचा स्वच्छ करा. त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.


काकडीचा रस


होळीचे रंग काढण्याचा हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. काकडीच्या रसात गुलाबजल आणि एक चमचा साईडर व्हिनेगर घालून मिश्रण तयार करा. रंग असलेल्या त्वचेवर ते लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे रंग गायब होऊन त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.


मुळ्याचा रस


होळीचे रंग काढण्यासाठी मुळ्याचा रस अतिशय फायदेशीर आहे. त्यासाठी मुळ्याच्या रसात बेसन आणि दूध मिसळा. त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे रंग निघण्याबरोबरच त्वचा मॉईश्चराईज होईल.


दुधात कच्च्या पपईचा गर


होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही हा उपायही करू शकता. यासाठी दुधात कच्च्या पपईचा गर घाला. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घालून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहार स्वच्छ करा.