मुंबई : प्रत्येक मुलीला तिची त्वचा मुलायम आणि नितळ हवी असे वाटत असते. मात्र वयात येताना शरीरात होणारे हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अ‍ॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवू शकतो. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निसतेज दिसायला लागते. 
चेहर्‍यावरील खड्ड्यांची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्हांला काही घरगुती उपायांची मदत होऊ शकते. हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


चेहर्‍यावरील खड्डे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेसनामध्ये दूध, लिंबू आणि दूध मिसळा. या मिश्रणाची पेस्ट त्वचेवर लावल्यास चेहर्‍यावरील खड्ड्यांचा आकार कमी होण्यास मदत होते. 


तेलकट त्वचा असणार्‍यांसाठी लिंबूरस आणि मधाचं मिश्रण चेहर्‍यावर चोळल्यास फायदा होतो. दिवसातून 2-3 वेळेस हा उपाय नियमित केल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहर्‍यावरील डाग कमी करण्यास मदत होते. 


चेहर्‍यावर नियमित कोरफडाचा गर आणि व्हिटॅमिन ईचं मिश्रण लावल्यास चेहर्‍यावर ग्लो येण्यास मदत होईल. रात्री हे मिश्रण चेहर्‍याला लावून झोपल्यास त्वचेवरील खड्ड्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. सोबतच कांजण्यांचे डाग दूर करण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरतो.  नक्की वाचा :   कांजण्यांंचे डाग हमखास दूर करतील हे घरगुती उपाय


मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाबपाणी हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहर्‍यावर खड्ड्यांचा त्रास असल्यास तो आटोक्यात राहतो. 


नक्की वाचा -  या 10 मिनिटांंच्या उपायाने कमी होईल चेहर्‍यावरील ओपन पोअर्सचा त्रास