तोतरेपणा कमी करायला मदत करतील `हे` घरगुती उपाय
अनेकदा लहान मुलांचे तोतरं बोलणं, लडिवाळ बोबडे बोल लोभसवाणे वाटतात. पण वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मुलांना हीच सवय लागते.
मुंबई : अनेकदा लहान मुलांचे तोतरं बोलणं, लडिवाळ बोबडे बोल लोभसवाणे वाटतात. पण वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मुलांना हीच सवय लागते.
हळूहळू यामधून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तुमच्या घरातही मुलांच्या बोलण्यात असा बोबडेपणा, तोतरेपणा असेल तर त्याला सुरूवातीच्या टप्प्यात कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील.
तोतरेपणा कमी करायला मदत करतील हे घरगुती उपाय
1. आवळा :
तोतरेपणा कमी करण्यासाठी मुलांना रोज कच्चा आवळा खायला द्यावा. साजूक तूपामध्ये आवळा पावडर मिसळून हे मिश्रण मुलांना नियमित खायला दिल्यास फायदा होऊ शकतो.
2. बदाम
मुलांची स्मरणशक्ती तल्लख करण्यासोबत तोतरेपणा कमी करण्यासाठीही बदाम फायदेशीर ठरतात. रात्री 10 बदाम भिजत ठेवा. सकाळी त्याची साल काढून 40 ग्राम तूपासोबत मिसळून, पेस्ट करून मुलांना खायला द्या.
3. काळामिरी
लहान मुलांमधील तोतरे बोलण्याची समस्या कमी करण्यासाठी 10 काळामिरी आणि बदाम यांची पेस्ट 10 दिवस मुलांना खायला द्यावी.
4. बडीशेप
ग्लासभर पाण्यात 5 ग्रॅम बडीशेपाचे दाणे मिसळा. हे मिश्रण निम्म होईपर्यंत उकळा. त्यानंतर या मिश्रणात खडीसाखरेची पूड व गायीचं दूध मिसळून प्यायला द्यावे.
5. खारीक
रात्री झोपण्यापूर्वी मुलांना ग्लासभर दूधात खारीकाचे तुकडे उकळून द्यावेत. दूध दिल्यानंतर त्यावर तासभर पाणी प्यायला देऊ नका.
हे केवळ घरगुती आहेत. त्यावर पूर्णपणे अवलंबून न राहता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधोपचार आणि स्पीच थेरपिस्ट्च्या सल्ल्यासोबत हे उपाय आजमवू शकता.