खोकला आणि घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय करुन पाहा
खोकला आणि घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी 6 घरगुती उपाय.
मुंबई : हिवाळा हंगाम आला आहे. हा ऋतू आपल्यासोबत आरोग्याशी संबंधित समस्याही घेऊन येतो. यामध्ये घसा खवखवणे, सर्दी होणे यांसारखे इतर आजार देखील उद्धभवतात. तसेच यात इतर अनेक ऍलर्जींचा समावेश होतो. तसेच वाढते प्रदूषण हे आजकाल अनेक आरोग्य समस्यांचे कारण बनले आहे. अशा वेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. चला जाणून घेऊया की यावर कोणते घरगुती उपाय रामबाण ठरु शकतील.
खोकला आणि घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी 6 घरगुती उपाय.
लवंग
जर तुमचा घसा खवखवत असेल तर, आपल्याला काहीही सुचत नाही आणि गोळ्या वैगरे खाऊन देखील त्याचा काही उपयोग होत नाही. अशावेळी लवंग हे घरगुती उपायांपैकी एक आहे. लवंगाचा तुकडा आणि थोडेसे खडे मीठ घ्या. त्यांचे एकत्र सेवन करा. हे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या घसा खवखवण्यापासून लवकरात लवकर मुक्त होण्यास मदत करेल, कारण हे संयोजन जळजळ कमी करण्यास मदत करते.
मुलेठी
विशेषत: हिवाळ्याच्या हंगामात घसा खवखवण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे मुलेठी चघळणे. मुलेठीपासूनही चहा बनवता येतो. तुम्हाला फक्त उकळत्या पाण्यात काही थेंब टाकावे लागतील आहेत. काही मिनिटांनी चहा गाळून त्यात थोडा मुलेठी टाकून सेवन करा.
काळी वेलची
काळी वेलची घसा खवखवणे बरे करण्यासाठी आश्चर्यकारकपणे काम करते. हे अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि हिवाळ्याच्या हंगामात कोरडा खोकला आणि घशाशी संबंधित इतर समस्या हाताळण्यास मदत करू शकते.
मध आणि आले
गरम पाण्यात आले आणि मध मिसळून प्यायल्याने खोकल्याला आराम मिळतो. आले आणि मध घसा शांत करतात. त्यामुळे घसा खवखवणे किंवा खोकल्यावर तुम्ही मध आणि आल्याचे सेवन करू शकता.
कोमट पाणी प्या
घसादुखीचा सामना करण्यासाठी हायड्रेशन ही गुरुकिल्ली आहे. हिवाळ्यात पाणी फारच कमी प्यायले जात असले तरी घसा ओलसर राहावा यासाठी कोमट पाण्याचे सेवन करत राहणे गरजेचे आहे. हे घशाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते, तसेच अशी कोणतीही समस्या असल्यास ती शांत करते.
हळद
हळद संसर्गाचा सामना करण्यास मदत करते. घसा दुखत असल्यास अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करा.