मुंबई : केसातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण काय नाही करत ? शक्य ते सगळे उपाय करतो. शॅम्पू बदलतो, ट्रिटमेंट घेतो, तेलाची चंपी करतो, पण समस्या काही दूर होत नाही. 


घरगुती, नैसर्गिक उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र कोंड्यामुळे इतर समस्या वाढतात. म्हणजे पिंपल्स येणे, केस गळणे, केसात खाज येणे. यासगळ्यावर एक घरगुती, नैसर्गिक उपाय आहे आणि तो परिणामकारक देखील आहे. 
तो म्हणचे टोमॅटोचा रस लावणे.


कसा होतो केसात कोंडा ?


त्वचेच्या पीएच लेवल(pH level)बदलाव झाल्याने फंगलसाठी अनुकूल वातावरण तयार होते. परिणामी फंगल इंफेक्शन होते. अशाप्रकारे केसात कोंडा होतो. पण केसांशी मुळाशी म्हणचे टाळूच्या त्वचेला टोमॅटोचा सर लावल्यास त्वचेच्या पीएच लेव्हलमध्ये संतुलन निर्माण होते. 


काय करावे ?


एक मध्यम आकाराचा लालसर टोमॅटोचा मिक्सरमध्ये वाटून सर काढा. तर एक टोमॅटोचा आतील गर हाताने दाबून एका वाटीत काढा. आता हा सर खोबरेल तेलात एकत्र करून केसांना लावा आणि नीट मसाज करा. २० मिनीटांनी साध्या पाण्याने केस धुवा. ही प्रक्रीया आठवड्यातून दोनदा करा. महिन्याभरात याचा परिणाम दिसून येईल.