घरगुती उपायांनी दूर करा चेहऱ्यावरील काळे डाग
चेहऱ्यावरील काळे डाग झटपट घालवण्यासाठी अनेक जण बाजारातील विविध उत्पादनांचा वापर करतात. मात्र त्यामुळे अनेकदा त्याचे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट होतात. आता तुम्ही घरच्या घरी उपाय करुन चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करु शकतात.
मुंबई : चेहऱ्यावरील काळे डाग झटपट घालवण्यासाठी अनेक जण बाजारातील विविध उत्पादनांचा वापर करतात. मात्र त्यामुळे अनेकदा त्याचे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट होतात. आता तुम्ही घरच्या घरी उपाय करुन चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करु शकतात.
लिंबाचा रस - लिंबाच्या रसात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी लिंबाचा रस कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा. तुमची स्कीन अधिक सेसेंटिव्ह असल्यास लिंबाच्या रसात मध मिसळू शकता.
बटाटा - बटाटाट्याचा वापर करुनही तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग घालवू शकता. कच्च्या बटाट्याच्या चकत्या करुन त्या चेहऱ्यावर रगडा. काही वेळाने चेहरा धुवाय
ताक - उन्हाळ्यात अमृतासमान मानले जाणारे ताकही चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यात मदत करते. ताकातील लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करते त्यामुळे चेहरा उजळतो. ताक आणि टोमॅटोचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग कमी होण्यास मदत होईल.