HOMEMADE REMEDY FOR  TOOTHACHE:     दातांचं दुखणं जेव्हा येत तेव्हा मात्र आपल्याला काहीच सुचत नाही. दातदुखी ही सर्वसामान्य दुखण्यांपैकी एक आहे पण बऱ्याचवेळा दातांचं हे दुखणं डोकेदुखी ठरते, काही खाता पिता येत नाही कुठेच लक्ष लागत नाही हे दुखणं अगदी असह्य होऊन जात..खाणं काय तर अगदी पाणी प्यायला हि वेदना होतात. 
दातदुखी इतकी असह्य वेदनादायी का असते, तर आपल्या दातांच्या खाली काही अशा नसा असतात ज्या प्रचंड संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह असतात जेव्हा बॅक्टरीया किंवा कीड या नसांपर्यंत पोहचतात तेव्हा गंभीर दुखणं उदभवू शकत.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दातदुखी कधी कधी इतकी भयंकर असते कि झोपेवर देखील त्याचा परिणाम होतो त्या दुखण्यामुळे शांत झोपदेखील लागत नाही 
 काही घरगुती उपाय पाहूया 



लसूण 


दातांचं दुखण नियंत्रित करण्यासाठी लसूण खूप फायदेशीर असतो यात एंटी-बैक्टीरियल गुणधर्म असतात जे पेन किलर म्हणून देखील काम करतात. यासाठी तुम्ही लसणाची चहा बनवून ती पिऊ शकता किंवा लसणाची कोवळी पाकळी चघळू शकता दुखत असेल त्या ठिकाणी लसणाची पेस्ट करून बसवावी आराम मिळेल 


लवंग तेल


लवंग तेलामध्ये युजेनॉल आणि एसिटिल यूजेनॉल असतं जे अँटी इंफ्लेमेटरी आणि एनलजेसिक आहे त्यामुळे दातांचं दुखणं बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते . 


कांदा


कांद्यात असणाऱ्या अँटी बॅक्टरील गुणधर्मांमुळे तोंडातील बॅक्टरीयावर त्याचा परिणाम जातो .त्याच्याशिवाय दातदुखीवर घरगुती उपाय म्हणून देखील याचा वापर के;ला जातो जर दातदुखीमुळे त्रस्त आहेत तर कांद्याचे काही तुकडे दुखऱ्या जागी ठेऊ शकता याने आराम मिळेल 


मीठाचं पाणी


दातदुखीवर मिठाच्या पाण्याने चूळ भरणे खूप फायदेशीर मानलं जात अत्यंत सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आहे यासाठी कोमट पाण्यात थोडासा मीठ घालून त्या पाण्याने चूळ भरावी दिवसातून दोन तीन वेळा हा उपाय करावा अराम मिळेल 


पुदिना


लवंगाप्रमाणे पुदिना दातांचं दुखं ,सूज कमी करण्यास फायदेशीर आहे.त्याचसोबत दातदुखीवर पेपरमिंट ऑइल चा वापर लेला जातो किंवा दातांवर पेपरमिंट टी  बॅग्स देखील ठेवल्या जातात.


काही घरगुती उपायांनी यावर तुम्ही इलाज करू शकता मात्र दुखणं जास्त काळ असेल किंवा गंभीर असेल तर मात्र  डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही उत्तम