मुंबई : लहानपणी मुलांना अंगठा चोखण्याची सवय लागते. प्रामुख्याने अंगठा चोखत मुलं झोपतात. वर पाहता लहान वाटणार्‍या या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास मुलांमध्ये ही सवय वाढते. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलं भूकी राहिल्याने हा त्रास त्यांच्यामध्ये अधिक वाढतो. स्तनपानातून पुरेसे दूध न मिळाल्यानेही ही सवय अधिक वाढते. मुलं  मोठी झाल्यानंतरही ही सवय कायम राहिल्यास त्यांच्यामध्ये काही आजार बळावण्याची शक्यता असते. परिणामी मानसिक विकासापासून ते आरोग्याशी निगडीत काही समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. म्हणूनच लहानसा वाटणारा हा त्रासही भविष्यात मोठा होऊ शकतो. 


अंगठा चोखण्याचा सवयीचा दुष्परिणाम 


मुलं दिवसभर वेगवेगळ्या खेळण्यासोबत खेळत असतात. त्यांच्या हाताला अनेक कीटाणूंचा संसर्ग होतो. नकळत असा हात तोंडात गेल्यास काही आजारांचा धोका बळावतो. 


अंगठा चोखण्याची सवय असणार्‍या मुलांमध्ये खाण्या पिण्याबाबत अरसिकता वाढते. सतत अंगठा चोखत राहतात. अशामुळे पोषकघटकांच्या अभावामुळे त्यांचा शारीरिक विकास होण्याची प्रक्रिया मंदावते.  


अंगठा चोखणार्‍या मुलांच्या मानसिक विकासावरही परिणाम होतो. मुलांचे लक्ष सतत अंगठ्यावर असते. त्यामुळे इतर गोष्टींवर ते पुरेसे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. परिणामी नव्या गोष्टी स्वतःहून शोधण्याची क्षमता मंदावते. 


अंगठा चोखण्याची सवय असणार्‍यांना इंफेक्शन होण्याचा धोका बळावतो. त्यामुळे पचनाचा त्रास, पोटदुखी असे त्रास बळावतात. 


अंगठा चोखणार्‍या मुलांच्या अंगठ्याचा आकारही रोडावतो सोबत ओठ मोठे होऊन ते लटकायला लागतात.