मुंबई : अंडी खाल्ल्याने शरीर निरोगी आणि मजबूत राहते. आरोग्य तज्ज्ञ न्याहारीमध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंडी खाल्ल्याने प्रोटीन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यांसारखे अनेक पोषक तत्व मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही एका दिवसात किती अंडी खाली पाहिजेत? जर नसेल तर ही बातमी पूर्ण वाचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही एका दिवसात किती अंडी खाऊ शकता?


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंड्यांचे सेवन हे तुमच्या शारीरिक गरजा आणि हालचालींवर अवलंबून असते. पण, अंड्याच्या पिवळ्या भागात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल असते, ज्यामुळे हृदयविकार वाढू शकतात. वॉशिंग्टनच्या सरकारी आरोग्य वेबसाइटनुसार, एका अंड्यामध्ये सुमारे 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि हृदयरोग टाळण्यासाठी, तुम्हाला दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल मिळायला हवे. त्यामुळे हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी रोज एक अंड्याचे सेवन करावे.


अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत. कारण, कमी शिजवलेल्या अंड्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अंड्याच्या बाहेरील आणि पिवळ्या भागात साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात. जे तुम्हाला आजारी बनवू शकते.


अंडी खाण्याचे फायदे


अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.
अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात.
अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.


अस्वीकरण: ही माहितीची सामान्य परिस्थितीसाठी दिली गेली आहे. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणे हा आहे.