Mens Health Tips: महिलांना जसं नटण सजण आवडत त्याप्रमाणे पुरुषांच आपल्या दाढीवर खूप प्रेम असत. दाढी ठेवणारे पुरुष नियमित दाढी ट्रिम राहील, काळी-भगगच्च कशी दिसेल याकडे लक्ष देतात. बरेच लोक महिने दाढी वाढवत राहतात आणि दाढी करत नाहीत.  त्यामुळे सध्या मोठ्या दाढी असलेले तरुण जास्त प्रमाणात दिसतात. दुसरीकडे काही लोक दररोज दाढी करतात. दाढी न ठेवणारे पुरुष नियमित क्लिन शेव कशी राहीलं याकडे लक्ष देतात. दाढी करणे किंवा न करणे पुरुषांची वैयक्तिक निवड असू शकते. पण त्याचा थेट परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दररोज शेव्हिंग केल्याने त्वचेला काही फायदा होतो का? की आठवड्यातून एकदाच दाढी करणे पुरेसे आहे. अशा प्रश्नांची उत्तरे पुरुष मंडळी सर्च करत असतात. याबद्दल जाणून घेऊया. 


पुरुषांच्या दाढीसंदर्भातअमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशन (एएडी) ने एक अहवाल तयार केला आहे. यामधून अनेक इंट्रेस्टिंग फॅक्ट्स समोर आले आहेत. दिवसभर धावपळ केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर, दाढीवर धूळ, तेल, जंतू आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होतात. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण याचे परिणाम कालांतराने दिसून येतात.


त्वचा आणि दाढी स्वच्छ


यापासून सुटका मिळवण्यासाठी पुरुषांनी फेसवॉश किंवा क्लिंजरने रोज आपला चेहरा आणि दाढी धुवावी. असे केल्याने त्वचा आणि दाढी स्वच्छ राहते. ज्या लोकांची दाढी मोठी असूनही दररोज नीट धुत नाहीत, अशावेळी त्वचेची छिद्रे अडकून त्वचेवर जळजळ होऊ शकते. हे जास्त वेळ केल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.


यावर उपाय काय?


आतापर्यंत दाढीच्या स्वच्छतेबाबतीत निष्काळजीपणा केला पण स्वच्छता कशी राखायची? असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. यासाठी काही उपाय जाणून घेऊया.दररोज आपला चेहरा आणि दाढी पूर्णपणे धुया. यावेळी घाई गडबड करु नका. काहीजण नुसते चेहऱ्यावर पाणी शिंपडून दाढी स्वच्छ केल्याचे सांगतात. पण दिवसभर तुमच्या दाढीवर धूळ आणि प्रदुषणाचा थर जमा झालेला असतो. 


कोमट पाण्याचा वापर


यासाठी मॉइश्चरायझ करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही फेस वॉश किंवा क्लिन्झरचा उपयोग करु शकता. कोमट पाणी वापरुन तुम्ही चेहरा स्वच्छ करु शकता. यामुळे त्वचेच्या मृत पेशींसह घाण आणि जंतू नष्ट होतात. तुमची दाढी मोठी असो वा नसो, नियमितपणे चेहऱ्याची साफसफाई करणे फार महत्वाचे आहे. याकडे कोणीही दुर्लक्ष करु नये अन्यथा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.


आठवड्यातून एकदा दाढी करावी? 


रोज दाढी करावी का? की आठवड्यातून एकदा दाढी करावी? असे प्रश्न विचारले जातात. हेल्थलाइनने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही किती वेळा दाढी करावी याचा काही निश्चित नियम नाही. तुम्हाला दाढी ठेवायची आहे की क्लिन शेव करण्यास प्राधान्य द्यायचे आहे? हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे.  


एक किंवा दोन दिवसांनी शेविंग


ऑफिसला जाणारे बहुतेक लोक दररोज दाढी करतात. रोज दाढी करताना रेझर तुमच्या गालावर फिरवता. अशावेळी तुमची दाढी कापली जाते तसेच त्वचेवर ब्लेड चालवता तेव्हा त्यामुळे त्वचेच्या पेशींचा एक थर देखील काढून टाकला जातो. त्वचेला यातून बरे होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे दररोज शेव्हिंग करण्याऐवजी लोकांनी एक किंवा दोन दिवसांनी दाढी करावी, असा सल्ला दिला जातो.