नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसतायत. आकडेवारी पाहिली तर दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद होतेय. या वाढत्या प्रकरणांमागील मुख्य कारण म्हणजे कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे. मात्र या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग एका व्यक्तीला किती वेळा होऊ शकतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकाच व्यक्तीला दोनदा कोरोनाचा संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. अशी अनेक प्रकरणं होती ज्यामध्ये एकाच व्यक्तीला दोनदा डेल्टा संसर्ग झाला होता. आता प्रश्न असा आहे की, ओमायक्रॉन प्रकार एखाद्या व्यक्तीला किती वेळा संक्रमित करू शकतो.


एका अहवालानुसार, ओमायक्रॉनमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा प्रकारापेक्षा 4 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीला 2 वेळा ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता सहज निर्माण होऊ शकते.


ओमायक्रॉनमध्ये अँटीबॉडीजला दाद न देण्याची क्षमता आहे, म्हणून हा व्हेरिएंट एखाद्या व्यक्तीला पुन्हा एकदा संक्रमित करू शकतो. त्यामुळे, अशा लोकांनाही सहज संसर्ग होतोय, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा त्यांना आधीच कोरोना किंवा ओमायक्रॉनची लागण झाली आहे.


सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार, ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी घराबाहेर पडणं टाळावं. बाहेर पडताना डबल मास्क वापरा. हात वारंवार स्वच्छ करा. त्याचप्रमाणे काहीही खाण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुवा.