Think about sex : सेक्सचा विचार तुम्ही दिवसातून किती वेळा करताय?
काही लोकं सेंकदाला सेक्सचा विचार करतात तर काही जणं दिवसातून एकदा लैंगिक संबंधांबाबत (Physical Relation) विचार करतात. पण तुमच्या मनात सेक्स किंवा इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं उलगडायचं?
Think about sex : सेक्सचा विचार आपण दिवसातून किती वेळा करतो? तुम्ही कधी याचा विचार केलाय का? काहींच्या म्हणण्यानुसार, काही लोकं सेंकदाला सेक्सचा विचार करतात तर काही जणं दिवसातून एकदा लैंगिक संबंधांबाबत (Physical Relation) विचार करतात. पण तुमच्या मनात सेक्स किंवा इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं उलगडायचं? तर यासाठी 'एक्सपिरिअरन्स सॅंपलिंग' (Experience sampling method ) या शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो.
The Ohio State University मधील तज्ज्ञांनी या पद्धतीचा वापर करून लोकांच्या मनात येणाऱ्या सेक्सच्या विचारांची मोजणी केली. यावेळी तज्ज्ञांनी एखादा विचार आला की तो त्याच क्षणी मोजायला सांगितलं. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थांना त्यांच्या विचारांची नोंद करून ठेवण्यास सांगण्यात आलं.
यानुसार, साधारणपणे पुरुषाच्या मनामध्ये एका दिवसात 19 वेळा सेक्सचा विचार येत असल्याचं समोर आलं, तर महिलांच्या मनामध्ये एका दिवसात 10 वेळा सेक्सचा विचार येत असल्याची नोंद झाली. यानुसार पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक वेळा सेक्सचा विचार येत असल्याचं समोर आलंय.
या संशोधनानुसार पुरुषांच्या मनात सेक्सविषयी विचार महिलांच्या तुलनेत जास्त वेळा येतो. मात्र याचं प्रमाण किती जास्त आहे?
सेक्स या विषयातील संशोधक आल्फ्रेड किन्सेने (Alfred Kinsey) यांनी केलेल्या संशोधनातून वेगळी माहिती समोर आली होती. यांच्या अभ्यासानुसार, 54 टक्के पुरुष एका दिवसात अनेकदा सेक्सचा विचार करतात, 43 टक्के पुरुष एका आठवड्यात किंवा महिन्यात काही वेळा सेक्सचा विचार करतात. याशिवाय तर 4 टक्के पुरुष महिन्यातून एकदा सेक्सचा विचार करतात.
लैंगिक समस्या ही अजूनही समाजात टॅबू मानली जाते. त्यामुळे अनेकजण ही बाब डॉक्टरांना सांगण्यासही कचरतात. मात्र असं करू नये. यामुळे जी काही समस्या असेल तर अधिक वाढेल. या समस्येबाबत लोकांच्या मनात फार भीती असते. पण खरंच या गोष्टीची भीती वाटली पाहिजे का?
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीसोबत सेक्शुअल विचार येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र दुसरं काहीच सुचत नसेल तर ही समस्या गंभीर असण्याची शक्यता आहे. साधारण दुसऱ्या व्यक्तींबाबत तुमच्या मनात असे विचार येण्याची विविध कारणे असू शकतात.