मुंबई : आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या आढळते. त्यामुळे काहीजण वजन घटवण्यासाठी तर काही फीटनेस जपण्यासाठी जीममध्ये घाम गाळतात. जीममध्ये नियमित जाण्याचा उत्साह सुरूवातीचे काही दिवस असतो नंतर हळूहळू कंटाळा येण्यास सुरूवात होते. पण वजन घटवण्यासाठी महागड्या जीमची मेंबरशीप घेण्यापेक्षा अनेक घरगुती उपायांनीदेखील त्यावर मात करता येऊ शकते. 


ऊसाचा रस - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन घटवण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील बॅड कॉलेस्टेरॉलचं प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होते. सोबतच त्यामध्ये सोल्युबल फायबर मुबलक असतात. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. शरीरात अतिरिक्त चरबीचं प्रमाणही कमी होते. ग्लासभर उसाच्या रसामध्ये 13  ग्रॅम डाएटरी फायबर असतात. 


आरोग्यदायी ऊसाचा रस 


ऊसाचा रस फॅट फ्री असल्याने हे 100 % नैसर्गिक पेय आहे. ग्लासभर ऊसाच्या रसात 111 कॅलरीज, 27 ग्राम कार्बोहायड्रेट्स,0.27 ग्राम प्रोटीन असतात. 


ऊसाच्या रसात फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स घटक आढळतात. ऊसात नैसर्गिकरित्या सुमारे 30 ग्राम साखर असते. त्यामुळे वजन घटवण्यासोबतच शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा देण्यास मदत होते. 


योग्य वेळी रस पिणे गरजेचे 


ऊसाचा रस वजन घटवण्यास मदत करते मात्र हा रस योग्य वेळी पिणं गरजेचे आहे. ऊसाचा रस रिकाम्या पोटी कधीच पिऊ नका. सकाळचा नाश्ता केल्यानंतर आणि दूपारच्या 1 वाजण्यापूर्वी ऊसाचा रस पिणं हितावह आहे. या काळामध्ये शरीराचा मेटॅबॉलिक रेट उत्तम असतो. संध्याकाळच्या वेळेस ऊसाचा रस पिणं टाळा. या काळात पचनशक्ती मंदावलेली असते. 


उन्हाळा आणि ऊसाचा रस  


उन्हाळ्याच्या दिवसात ऊसाचा रस फायदेशीर आहे. तीव्र उन्हामुळे डीहायड्रेशनचा त्रास वाढतो. अशावेळेस ऊसाचा पिणं आरोग्यवर्धक आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यांवर ऊसाचा रस पिताना स्वच्छता पाहूनच त्याची निवड करा.