मुंबई : ए..तोंडातला अंगठा काढ बाहेर...१-२ वर्षांच्या लहान मुलांना अंगठा चोखायची फार सवय सवय असते. या मुलांना ही सवय इतकी लागलेली असते की झोपेतही त्यांच्या तोंडात अंगठा दिसतो. लहान मुलांमध्ये ही सवय सामान्य असल्याने आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र मुलांकडून जर ही सवय सुटली नाही तर परिणाम लहान मुलांवर दिसून येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, लहान मुलांना असणारी अंगठा चोखायची सवय ही सामान्यपणे दिसून येते. मुळात ही सवय मुलांसाठी सोयीस्कर ठरते. मात्र जर पाच वर्षांपुढील मुलांमध्ये ही सवय दिसून येत असेल तर ती सवय दातांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.


अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या मताप्रमाणे,


  • ज्या मुलांना अंगठा चोखायची सवय असते त्यांना मोठेपणी दातांसंबंधीच्या समस्या दिसून येतात

  • जर ही सवय वेळीत सुटली नाही तर कायम स्वरूपी येणाऱ्या दातांवरही त्याचा परिणाम होतो

  • वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत मुलांची ही सवय शक्यतो सुटते

  • मात्र जर ही सवय वेळीच सुटली नाही तर डेंटिस्टची मदत घ्या

  • अंगठा चोखण्याच्या सवयीमुळे मुलांवर होणारे परिणाम

  • मुलांनी सतत अंगठा चोखल्याने दातांची ठेवण बदलू शकते

  • मुलांचे खालचे दात पुढे येण्याची शक्यता असते

  • सतत अंगठा तोंडात राहिल्याने वरचे आणि खालचे दात एकमेकांवर येत नाहीत. यामुळे दातांमध्ये कायमस्वरूपी जागा निर्माण होते

  • दातांमध्ये जागा राहिल्याने बोलताना जीभ सतत बाहेर येऊ शकते. यामुळे बोलतानाही समस्या येऊ शकतात

  • खाद्यपदार्थ योग्यरित्या चावता न येणं

  • सतत अंगठा तोंडात असल्याने बोटाच्या त्वचेवर परिणाम होतो.


मुलांची सवय कशी मोडावी


  • लहान मुलं अंगठा का चोखतात याचं कारण शोधा.

  • मुलं अंगठा चोखणार नाहीत यासाठी त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा

  • मुलं झोपल्यावर जर त्यांच्या तोंडात बोट असेल तर ते बाहेर काढा

  • मुलांच्या बोटाला बँडेज लावा जेणेकरून मुलं बोटं तोंडात घालणार नाही

  • अंगठा चोखू नये हे मुलांना समजावून सांगा

  • मुलांच्या अंगठ्याला लिबांचा रस लावावा यामुळे मुलं अंगठा चोखणार नाहीत