How To Control High Blood Pressure: गेल्या काही वर्षात बहुतांश लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. हे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. खराब फिटनेस आणि चुकीची दिनचर्या यामुळे रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात घातक ठरू शकतं. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, देशातील सुमारे 30 टक्के तरुणांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी आहेत आणि त्यामागे खराब जीवनशैली कारणीभूत आहे. दरम्यान, एका तज्ज्ञाने सांगितले आहे की, केवळ पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो, परंतु यासाठी एक विशेष पद्धत अवलंबावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला रोज किती पाणी प्यावे लागेल?


उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज 8 ग्लास पाणी प्यावे लागते. द मिररच्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या एमडी डॉ. मोनिका वासरमॅन यांनी सांगितले की, मी नेहमी माझ्या रुग्णाला दररोज 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देते.


रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पाण्याची कशी मदत होते?


डॉ मोनिका वासरमॅन म्हणाल्या, 'पाणी शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकते आणि रक्त डिटॉक्स करण्यास मदत करते.' सोडियममुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.


पिण्याच्या पाण्यासोबतच खाण्याचीही काळजी घ्या


डॉ मोनिका वासरमॅन यांच्या मते, पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, याचा अर्थ असा नाही की फक्त त्यावर अवलंबून राहावे. यासोबतच जेवणाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. असे अनेक पदार्थ आहेत जे रक्तदाब कमी करू शकतात. चरबीयुक्त मासे आणि क्रॅनबेरीचा ज्यूस देखील उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत करतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)