मुंबई: आवाक्याबाहेरची ध्येये, त्यासाठी केली जाणारी धावपळ, बदलत्या जिवनशैलीमुळे दैनंदिन ताण-तणाव याचा परिणाम आरोग्यावर कधी आणि नेमका कसा होतो, हे लगेचच ध्यानात येत नाही. पण, थोडा थोडा करत हा ताण तुमच्या शरीरावर मोठा परिणाम करतो. त्याचे रूपांतर रक्तदाबात होते. पुढे जाऊन हृदयरोगाचाही धोका संभवतो. म्हणून वेळीच जर काळजी घेतली तर, कदाचित भविष्यात होणाऱ्या त्रासापासून सूटका होऊ शकते. त्यासाठी योगा परिणामकारक ठरतो. म्हणूनच वाढता रक्तदाबा नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच, रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठीही तुम्हाला फायदेशीर ठरतील अशी काही योगासने आम्ही तुम्हाला सूचवत आहोत.


सर्वांगासन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, योगासनामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच, शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहून मेंदूचा रक्तपुरवठाही चांगला राहतो. ज्यामुळे चक्कर येणे, थकवा हे प्रकार कमी होतात.


मत्स्यासन


तसे हे एक सोपे पण काहींना कठीण वाटणारे आसन आहे. या आसनामुळे शरीरातील पचनशक्ती वाढते. रक्ताभिसरण सुधारते. ज्याचा परिणाम रक्तदाब नियंत्रणात राहण्यात होतो. कंबर आणि गळ्याच्या त्रासावर नियंत्रण मिळविण्यासाठीही हे आसन फायदेशिर ठरते.


उष्ट्रासन


हा शब्द उच्चारायला काहीसा वेगळा वाटतो खरा. पण, दोन शब्दांच्या संयोगाने हा शब्द बनला आहे. 'उष्ट्र'चा अर्थ उंट असा होतो. या आसनातील व्यक्ती उंटासारखी दिसते. म्हणून या आसन उष्ट्रासन संबोधतात. या आसनाचा परिणाम म्हणजे रागावर नियंत्रण, शरीरातील रक्ताभिसरण सुधार, विचार करण्याची क्षमता वाढणे.


बालसाना


रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने हे आसन करण्यास मुळीच हरकत नाही. या आसनामुळे शरीरातील रक्तपुरठा वाढतो. शरीर उत्साही राहतेच. मेंदुचार रक्तपुरवठा सुधारतो.