मुंबई : कामाच्या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, विचारधारणेची लोकं एकत्र काम करत असतात. आजकाल कॉपरेट क्षेत्रामध्ये 'टार्गेट'मागे धावताना दिवसातला सर्वाधिक वेळ अनेकजण ऑफिसमध्ये असतात. अशावेळेस ताणतणावामुळे, वैचारिक मतभेदांमुळे भांडणं किंवा वाद होणं स्वाभाविक असतो. सतत अशा वातावरणात राहिल्याने सहाजिकच तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. कामाचा ताण किंवा राग तुमच्या प्रिय व्यक्तीवर किंवा कुटुंबावरही नकळत काढला जातो. तुमच्या या एका लहानशा चूकीमुळे सारं बिघडू शकतं. मग हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. 


भांडणं टाळा - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचे काही लोकांसोबत मतभेद असले तरीही त्याचे परिवर्तन भांडणामध्ये होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हांला एखादी गोष्ट, व्यक्ती पटत नसेल तर त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. 


इसेन्शियल ऑईल -  


ताण हलका करण्यासाठी इसेन्शियल ऑईल फायदेशीर आहे. तुमच्या डेस्कवर आवडीचं इसेन्शियल ऑईल ठेवा. त्याच्या मंद सुवासामुळे ताण हलका होतो. 


विनोदी व्हिडिओ 


ताण हलका करायचा असेल किंवा एखाद्या गोष्टीवरून तुमचं लक्ष हटवायचं असेल तर कामातून वेळ काढून विनोदी व्हिडिओ पहा. यामुळे ताण हलका होण्यास मदत होईल. 


मित्रांसोबत बोला 


तुम्हांला एखाद्या गोष्टीचा ताण जाणवत असेल तर त्याच्याबाबत तुमच्या मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीसोबत बोला. बोलल्याने ताण हलका होण्यास मदत होते. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी कदाचित त्यांच्याकडून काही मार्ग निघू शकतो. ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठीच्या काही टिप्स!


योग्य आहार 


आहारात आरोग्याचं गणित लपलं आहे. त्यामुळे ताण हलका करायचा असेल आहारत जंकफूड टाळा. व्यायामासोबत संतुलित आहाराचा समावेश करा. 


कामातून वेळ काढून फिरा 


कामातून थोडा वेळ काढून दहा मिनिटं बाहेर फिरा. तुमच्या ऑफिसमध्ये बाग असेल तर तेथे फेरफटका मारा. यामुळे एन्ड्रॉर्फिन हार्मोन्सचा प्रवाह होतो. या हार्मोनमुळे शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते.