Postpone Periods Naturally: औषधांशिवाय मासिक पाळी पुढे ढकलायचीये? करा हे घरगुती उपाय
Periods पुढे ढकलण्यासाठी औषध घेता? त्यानं शरिरावर होतात वाईट परिणाम... जाणून घ्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घरगुती उपाय...
मुंबई : आता आपल्याला घर बसल्यासुद्धा प्रत्येक गोष्टीवर औषधं मिळतात. त्यात महिलांसाठी त्यांच्या पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठीही अनेक औषध मिळतात. ही औषधं तुमची मासिक पाळी काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यासाठी मदत करतात. पण त्या औषधांचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम देखील होतात ज्यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.(period delay pills)अशा अनेक महिला आहेत ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषध घेतात. त्यामुळे या गोळ्या त्यांच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतात. (how to delay your period without pills) त्यामुळे ही औषधं घेण्यापेक्षा घरगुती उपाय करत तुमची मासिक पाळी पुढे ढकला. यामुळे तुमच्या शरिरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. (Postpone Periods Naturally)
जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा वापर करत तुम्ही मासिक पाळी पुढे ढकलू शकता.
Apple Cider Vinegar- जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीची तारीख पुढे ढकलायची असेल तर तुम्ही कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घालून ते पाणी तुमच्या मासिक पाळीच्या 10 ते 12 दिवस आधी सेवन करा.
मोहरी (Mustard) - एक चमचा मोहरी रात्रभर पाण्यात/दुधात भिजत घाला आणि मासिक पाळी सुरू होण्याच्या एक आठवड्या आधी पासून याचे सेवन करण्यास सुरुवात करा. यामुळे तुमची मासिक पाळी उशीर होऊ शकते.
लिंबाचा रस (Lemon Juice)- अॅपल सायडर व्हिनेगरप्रमाणेच कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने मासिक पाळी पुढे जाऊ शकते.
हेही वाचा : Sanitary Napkins महिलांसाठी ठरतात जीवघेणे? नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा
जिलेटिन (Gelatin) - मासिक पाळीची तारीख पुढे ढकलण्यासाठी जिलेटिन खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी गरम पाण्यात जिलेटिनचं एक पॅकेट मिसळा. हे केल्यानं तुमची मासिक पाळी ही 4 तास उशिरा येऊ शकते.
काकडी (Cucumber) - काकडीच्या कूलिंग इफेक्टमुळे मासिक पाळी लांबण्यास मदत होते. असे म्हटले जाते की थंड पदार्थांमुळे मासिक पाळी येण्यास थोडा उशिर होऊ शकतो. मासिक पाळीच्या तारखेच्या सुमारे एक आठवडा आधी काकडीचे सेवन करा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)