मुंबई : उष्णतेसोबतच आता मच्छरांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. मच्छरांच्या चावल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण देखील वाढत आहे. दरवर्षी मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांच प्रमाण वाढत असतं. मच्छरांचं प्रमाण कमी व्हाव म्हणून दरवर्षी महानगरपालिकेकडून साफ-सफाई अभियान देखील राबवले जाते. मात्र या आजारांपासून अद्याप सुटका मिळालेली नाही. 


CO 2 वरून ओळखतात व्यक्ती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाचे उत्तर एका संशोधनात मिळाले आहे. संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, मादी डासांना आपले भक्ष्य शोधण्यासाठी वास आणि दृष्टी या दोन्हींची आवश्यकता असते. 


व्यक्ती कार्बन डायऑक्साइड (CO2) श्वास बाहेर टाकतो. ज्याचा विशिष्ट गंध असतो. मादी डास हा वास घेते आणि माणसाच्या जवळ पोहोचते आणि मग ती आपली दृष्टी वापरून त्यांना शिकार बनवते.


१०० फूटावरून ओळखतात गंध 


शास्त्रज्ञांनी सांगितले की, मादी डासांमध्ये 100 फूट अंतरावरून वास घेण्याची क्षमता असते. एका सेकंदात आपण जी हवा सोडतो ती कार्बन डायऑक्साइडच्या ५% असते.


त्याचा वास आल्यावर मादी डास वेगाने माणसाकडे उडतात. संशोधनात असेही आढळून आले आहे की, प्रदक्षिणा घालणाऱ्या वस्तूंकडे डास जास्त आकर्षित होतात, परंतु कार्बन डायऑक्साइडपेक्षा कमी असतात.


अशी ओळखतात माणसाची चाहूल 


मादी डास आपल्याला शोधतात कारण ते मानवी वासाचे वेगवेगळे घटक ओळखण्यास सक्षम असतात. या वासांच्या साहाय्याने डास जेव्हा आपल्या जवळ येतात तेव्हा त्यांना आपल्या शरीरातील उष्णतेने आपला ठावठिकाणा कळतो.


शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मादी डासांमध्ये वास घेण्याची क्षमता संपुष्टात आली तर आपण डास चावण्यापासून वाचू शकतो.