Pimple Home Remedies : सध्या मुंबईतील हवा ही अतिप्रदूषित म्हणून गणण्यात आली आहे.पण आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये.  प्रदूषण म्हटलं की, त्वचेवर त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो. परिणामी त्वचेवर पुरळ उठणं, खाज येणं, डार्क पॅचेस येणं सर्व समस्या सुरु होतात. त्यात जर पाहिलं, तर हल्ली मुरूमांची समस्या तरुणाईमध्ये अधिक आढळून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, प्रदूषण, (Pollution in mumbai) ताण तणाव (stress management) या सर्वांचा परिणाम म्हणून चेहऱ्यावर मुरुमे येतात. यासाठी बाजारात अनेक केमिकल उत्पादने उपलब्ध असतात. मात्र त्यांचा तसा फारसा परिणाम होताना दिसत नाही. परिणाम झालाच तरी तो तात्पुरता असतो.  मुरुमांना कायमच घालवायचं असेल तर काही घरगुती उपाय आहेत ते आजमावून तुम्ही फरक पाहू शकता. 


बर्फ थेरपी (ice therapy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहऱ्यावर मुरुमं आल्यास त्यावर बर्फ लावणं उत्तम. यामुळे मुरुमांचा लालसरपणा कमी होतो. तसेच सूजही कमी होते. बर्फ लावल्याने मुरुमं कमी होण्यास मदत होते. कपड्यामध्ये बर्फ घेऊन तो मुरुमांच्या जागी काही वेळ ठेवा.हा उपाय दिवसातून दोनदा करावा , तुम्हाला लवकरच त्याचा परिणाम जाणवू लागेल.  (pimple solution at home)


टूथपेस्ट (toothpaste)


मुरुमं आल्यावर त्यावर सफेद टूथपेस्ट लावा. यामुळे मुरुमांची सूज कमी होण्यास मदत होते. मात्र हे ध्यानात ठेवा, जेल टूथपेस्टचा वापर करू नका.  


स्टीम 


चेहऱ्यावर चमक हवी असल्यास स्टीम गरजेची आहे. यामुळे चेहऱ्यावरची केवळ  घाण दूर होत नाही तर त्वचा मुलायम होण्याससुद्धा मदत होते. स्टीममुळे रोमछिद्रे म्हणजेच पोर्स खुले होतात त्यामुळे एकप्रकारे त्वचा श्वास घेते असं म्हणतात, त्यामुळे त्वचेचं पोषण होतं. मात्र स्टीम घेतल्यावर चेहऱ्यावर मॉइस्चरायझर लावायला विसरू नका. 


लसूण (garlic)


लसणामध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल तसेच अंटीसेप्टिक आणि अँटऑक्सिंडंट्स सारखे गुणधर्म असल्याने मुरुमांवर लसूण गुणकारी ठरतो. यातील सल्फर त्वचेसाठी लाभदायक असतं. लसूण सोलून तो मुरुमांवर लावा. पाच ते सात मिनिटे लसूण लावून ठेवा नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. 


अंड्यातील सफेद भाग (egg white)


अंड्यातील सफेद भागात प्रोटीन असतं. अंड्यातील सफेद भागामुळे चेहऱ्यावरील  डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी तीन अंड्याचा सफेद भाग एकत्रित करा. त्यानंतर ही पेस्ट मुरुमांवर लावा. जेव्हा पेस्ट सुकेल तेव्हा चेहरा धुवून टाका. असे आठवड्यातून चार वेळा करा. 


टोमॅटो (tomatto)


टोमॅटो तेलकट त्वचेसाठी उपयुक्त आहे . टोमॅटोमुळे ब्लॅकहेड्स तसेच चेहऱ्यावरील काळेपणा दूर होण्यास मदत होते. ताज्या टोमॅटोचा रस बनवून तो चेहऱ्यावर लावा. त्यानंतर एका तासाने चेहरा धुवा. 


केळ्याचे साल (banana peel)


केळं खाणं शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याचे सालसुद्धा . मुरुमं झाल्यास केळ्याची साल चेहऱ्यावरुन फिरवा. 30 मिनिटं तसेच ठेवा. त्यानंतर चेहऱा धुवून टाका.


(टीप: वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर दिली आहे. झी २४ तास याची खातरजमा करत नाही)