Dark undereye Treatment : अधिक ताणामुळे किंवापुरेशी झोप घेतली नसेल  तर  डोळ्यांखाली काळी वर्तुळ निर्माण होतात. पुरेशी झोप न मिळाल्यानं ही समस्या आणखीनच वाढत जाते. ही समस्या तुमचाही पाठपुरावा करत असेल तर ती दूर करण्याचे हे काही साधे, सोप्पे आणि घरगुती उपाय आजमावून पाहा... (dark undereye treatment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या डोळ्यांच्या वर आणि खाली असलेली त्वचा चेहऱ्याच्या इतर भागांच्या प्रमाणात आणखीनच नाजूक असते. याशिवाय डोळ्यांखाली माइश्चरायजर ग्रंथीही नसतात. त्यामुळेच त्वचेच्या या भागावर वय, तणाव आणि निष्काळजीपणाचा प्रभाव लवकर दिसून येतो. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात सोप्पा उपाय म्हणजे वेळेवर आणि पुरेशी झोप घ्या. (lack of sleep causes dark undereye problem)


- एक चमचा गुलाबपाणी, एक चमचा काकडीचा रस एकत्र करून घ्या... आणि हे पाणी डोळ्यांखाली नियमित फिरवा.


- कच्च्या हळद दुधामध्ये बुडवून घासून घ्या... या पेस्टमध्ये थोडा मध मिसळून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी हा लेप डोळ्यांखाली लावून झोपून जा... सकाळी चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.


- एक बदाम रात्रभर दुधात भिजवून घ्या. सकाळी उठल्यानंतर हा बदाम घासून त्याची पेस्ट बनवून ती डोळ्यांखाली लावा आणि सुकल्यानंतर पाण्यानं धुवून टाका.


- काकडीच्या रसात लिंबू पिळून हे पाणी कापसानं टिपून हा ओला कापूस डोळ्यांखाली काही वेळ लावून ठेवा.


- अर्धा चमचा काकडीचा रस, दोन थेंब मध, दोन थेंब बटाट्याचा रस, दोन थेंब बदामाचं तेल एकत्र करून... नियमितपणे हा रस डोळ्यांखाली लावल्यानं ही समस्या दूर होईल.


- बटाटयाचा किस करून पातळ कपड्यात ठेवून त्याची छोटीशी पुरचुंडी बांधून घ्या... आणि ही पुरचुंडी हलक्या हातांनी डोळ्यांखाली काही वेळ फिरवा. असं नियमित केल्यानंही या समस्येपासून सुटकारा मिळेल. 


- तुमच्या डोळ्यांजवळ खूप गडद मेकअप करणं टाळा... यामुळे तुमच्या डोळ्यांनाही खूप नुकसान होतं... झोपण्यापूर्वी मेकअप काढणं विसरू नका. 


- खूप जास्त किंवा खूप कमी प्रकाशात लिखाण-वाचन करणं टाळा.... सलग काही तास कम्प्युटरवर काम केल्यानंही डोळ्यांना खूप नुकसान होतं. (dark undereye problems)