मुंबई : घरातून उंदरांना बाहेर काढणं हे फारच कठीण काम असतं. घरात उंदराचा प्रवेश झाला की कपड्यांपासून अगदी स्वयंपाकघरातील पदार्थ,इलेक्ट्रोनिक्स वस्तू सार्‍यांनाच जपणं एक मोठं आव्हान होऊन बसतं. मात्र काही केमिकल फ्री पदार्थांचा वापर करूनही तुम्ही ही उंदरांना घराबाहेर काढू शकता.  उंदरांप्रमाणेच झुरळांचा स्वयंपाकघरात वावर असणं त्रासदायक ठरू शकतं, मग पहा घरातून झुरळ, पाल, ढेकून यांना बाहेर ठेवण्याचे हे नैसर्गिक उपाय .  


पुदीन्याचं तेल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातील उंदरांना बाहेर काढण्यासाठी पुदीन्याचं तेल फायदेशीर ठरतं. कापसाच्या बोळ्यावर पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाका. पुदीन्याच्या तेलाचा उग्र वास उंदरांना घरात प्रवेश करण्यापासून रोखतो. उंदरांना लांब ठेवायचे असेल तर घराच्या बाल्कनीत पुदीन्याचं झाडही लावू शकता. 


 मांजर  


  उंदीर - मांजराचा खेळ आपण सारेच जण जाणतो. उंदीर मांजरांना घाबरत असल्याने तुमच्या घरात मांजर पाळा म्हणजे आपोआपच उंदीर घरापासून लांब राहतील.  
 
 तुरटीची पावडर  


 घराजवळ एखादं उंदराचं बीळ असेल तर सहाजिकच तेथून उंदीर तुमच्या घरात प्रवेश करण्याची शक्यता असते. अशावेळेस बीळाजवळ तुरटीची पावडर टाकल्यास ते लांब जाण्याची शक्यता असते. 


घुबडाचे पंख 


उंदीर घुबडाच्या पंखांनाही घाबरतात. उंदराच्या बीळाजवळ जर तुम्ही घुबडाचा पंख ठेवल्यास ते लांब पळून जाण्याची शक्यता आहे.  


काळामिरी 


काळामिरीचाही उग्र वास उंदरांना लांब ठेवण्यास मदत करतात. उंदराच्या बीळाजवळ काळामिरी पूड टाका. त्याच्या वासाने उंदीर लांब जाण्याची शक्यता आहे.  


कांदा 


स्वयंपाकघरात कांदा ठेवल्यानेही उंदीर लांब जातात. त्यामुळे ज्याठिकाणी उंदीर येतील अशी तुम्हांला भीती असेल तेथे कांदा फोडून ठेवा. त्याच्या वासाने उंदीर फिरकत नाहीत.  


मानवी केस 


उंदीर माणसांच्या केसांनाही घाबरतात. मानवी केस खाऊन उंदीर मरतात त्यामुळे गळलेले केस टाकून देण्याऐवजी उंदराच्या बीळाजवळ ठेवा.