मुंबई : चामखीळीचा त्रास हा त्वचारोगांपैकीच एकच आहे. फारसा त्रासदायक नसल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र सौंदर्याच्या दृष्टीने चामखीळीचं वाढणं त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच चामखीळ लहान स्वरूपात असतानाच त्याला काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणं फायदेशीर ठरू शकतं.  
चामखीळ मोठ्या प्रमाणात असल्यास वैद्यकीय उपचारांनी त्यापासून सुटका मिळवा. मात्र सुरूवातीच्या टप्प्यावर मात्र चामख़ीळ हटवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. 


चामखीळीचा त्रास दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बोरीचा काटा चामखीळीचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. चामखीळ कमी करण्यासाठी बोरीचा काटा तूपामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर निवडूंगाच्या चीकामध्ये बुडवून तो चामखीळीवर लावा. हा उपाय नियमित 2-3  दिवस केल्याने चामखीळीचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. यासोबतच चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरतात.


त्वचेवर बेंड उठत असेल तर त्यावरही बोरीची पानं फायदेशीर ठरतात. याकरिता बोरीची काही पानं स्वतःच्या लाळेमध्ये कुस्करून त्वचेवर लावा. नियमित या उपायानेही बेंड  कमी होण्यास मदत होते. परंतू हा उपाय सुरूवातीच्या टप्प्यामध्ये करणंच अधिक फायदेशीर आहे. 


महत्त्वाची टीप - सदर उपाय हे 'आपली माती आपली मानस' या युट्युब चॅनलवर सांगितले आहेत. हे केवळ घरगुती उपाय आहेत. त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 'झी 24 तास' कोणत्याही उपायांचे थेट समर्थन करत नाही. व्यक्तीपरत्वे उपायांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.