या `५` गोष्टींवरुन ओळखा तुमच्या मित्र-मैत्रिणीचा खरेपणा!
खरा मित्र ओळखणे महाकठीण काम.
मुंबई : एखाद्या व्यक्तीला ओळखणे, हे जगातील सर्वात कठीण काम आहे. आणि हे काम तेव्हा अधिक कठीण होते जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमंडळीतील एखाद्या मित्राला ओळखू शकत नाही. म्हणजे हा नक्की कसा आहे किंवा नक्की माझा चांगला मित्र आहे की फक्त तसं दाखवतो? तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असे संभ्रम कायम पडले असतील. खरा मित्र ओळखणे महाकठीण काम.
खरंतर मैत्री आयुष्यात आनंद आणते. पण मैत्री दुखावले गेल्यावर मात्र सारं काही नकोसं वाटतं. अशावेळी खऱ्या मित्र आणि स्वार्थी मित्र कसा ओळता आला तर काहीसं सोपं होईल. पण हे नेमकं ओळखावं कसं? त्यांच्यात नेमका काय फरक असतो? जाणून घेऊया फ्रेंडशिप डे निमित्त...
# खऱ्या मित्राला तुमच्या सर्व गोष्टी ठाऊक असतात. कोणत्या परिस्थित तुम्ही कसे वागाल, हे त्याला नीट कळते. कोणत्याही बाबतीत तो तुम्हाला भडकवण्याऐवजी समजवेल. तर स्वार्थी मित्र कायम भडकवत राहील. अशा लोकांपासून दूर राहा.
# खरा मित्र तुमचे सिक्रेट सिक्रेटच ठेवेल. ते इतरांशी शेअर करणार नाही. तुम्ही उदास, नाराज, दुखी असल्यावर तो तुमच्यासाठी नेहमी तयार असेल. टाईमपास करणारे मित्र तुमच्यासोबत फक्त आनंद साजरा करतील.
# खरा मित्र कोणत्याही परिस्थितीत तुमची मदत करायला तयार होईल. त्याचबरोबर तुम्हाला भेटायला नेहमी वेळ देईल.
# तुमची एखादी गोष्ट त्याला खटकल्यास त्याबद्दल तो तुमच्याशी बोलेल. तुम्हाला लगेच माफ करेल. पण मतलबी मित्र नेहमी भांडत राहील. मागून तुमची निंदा करेल.
# तुमच्या यशातही तुमच्यासोबत राहणाऱ्या आणि तुमच्या सुखातही तुमच्यापेक्षा अधिक खूश होणारी व्यक्ती खरा मित्र असेल.