असे करा स्वतःवर प्रेम....
आजकालच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनात आपण स्वतःकडे फारसे लक्ष देत नाही.
मुंबई : आजकालच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनात आपण स्वतःकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र स्वतःवर प्रेम करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. हे प्रेम नेमके कसे करावे, या जाणून घेऊया...
स्वतःला पुन्हा भेटा
स्वतःवर प्रेम करायला सुरूवात करा. तुम्हाला इतरांकडून जशा वागणूकीची अपेक्षा असते तशी वागणूक तुम्ही स्वतःला द्या. स्वतःच्या आसपासचे वातावरण शांत आणि प्रेमपूर्वक ठेवा. स्वतःवर प्रेम करा, हे सांगणे आणि ऐकणे जितके सोपे आहे. तितके करणे मात्र कठीण. कारण तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्हाला नुकसान पोहचवणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर रहा. उदा. सुस्त जीवनशैली, वाढलेले वजन, अतिविचार करण्याची सवय, बिघडलेले नातेसंबंध, मद्यपान-धुम्रपानाची सवय, इत्यादी.
नवीन लाईफस्टाईल अंगिकारा
खेळ आवडत असेल तर खेळा. जिमला जा. त्यामुळे फिट राहण्यास मदत होईल. व्यायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते.
प्रत्येक २ तासाने काहीतरी हेल्दी खा.
भरपूर पाणी प्या.
सकारात्मक विचार करा.
संतुलित आहार घ्या.
तणावापासून दूर रहा
वर्तमानात जगा. तुम्हाला जर खूप अधिक विचार करण्याची सवय असेल तर तुमची अस्वस्थता वाढू शकते. तणावावर मात करण्याचा सोपा उपाय म्हणजे रोज योगसाधना, ध्यान करा.
स्वतःचा आनंद इतरांवर अवलंबून ठेऊ नका.
स्वतःला आणि इतरांना नेहमी प्रेरणा देत रहा. विनम्र रहा. दयाळू रहा. नेहमी दुसऱ्यांची मदत करा. इतरांना माफ करायला शिका. सकारात्मक विचारांनी स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य प्रेरित करा.