उन्हाळ्यात जरुर प्या गुलाबाचे सरबत
उन्हाळ्यात गुलाबाचे सरबत शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीर केवळ थंडच राहत नाही तर अनेक फायदेही होतात.
मुंबई : उन्हाळ्यात गुलाबाचे सरबत शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीर केवळ थंडच राहत नाही तर अनेक फायदेही होतात. या सरबताचे खास वैशिष्ट्य याचा सुगंध. यासोबतच गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये औषधी गुणही असतात ज्याचा आरोग्याला खूप फायदा होतो. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असलेले फायबर पोट तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. पोट फुगत असेल तर ही समस्या दूर होते. गुलाबाच्या पाकळ्यांचे सरबत प्यायल्याने लघवीचा त्रास दूर होतो. शरीरातील उष्णता कमी होते. यात अँटीऑक्सिडंट असल्याने वाढत्या वयामुळे येणाऱ्या सुरकुत्या दूर होतात.
असे तयार करा गुलाबाचे सरबत
गुलाबाच्या पाकळ्या तोडून घ्या. थंड पाण्याने या पाकळ्या दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवा. या पाकळ्या एका बाऊलमध्ये ठेवून हे पाणी उकळू द्या. काही मिनिटांनी गुबालाच्या पाकळ्या पांढऱ्या होताना दिसतील आणि पाण्याला गुलाबी रंग येईल. जेव्हा पानांचा संपूर्ण रस पाण्यात उतरेल तेव्हा गॅस बंद करा. एका पॅनमध्ये हे पाणी घ्या. यात रोझ वॉटर घाला. यात एक छोटी वाटी साखर टाका. चांगले उकळून घ्या. साखर संपूर्ण विरघळली पाहिजे. हे मिश्रण घट्ट होऊ लागेल. यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या.जेव्हा हे मिश्रण गार होईल यात थंड पाणी वा बर्फ टाकून सरबत तयार करा. यात सरबतामध्ये तुम्ही डेझर्टसारखे आईसक्रीम वा कस्टर्डही टाकू शकता.