मुंबई : पती-पत्नीचे नाते फार नाजूक नातं असतं. या नात्यात प्रेम, मैत्री, भांडणं हे सगळं होतच असतं आणि चांगल्या नात्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु हे लक्षात घ्या की, कितीही झालं तरी नवरा-बायकोमधील भांडण हे लवकरात लवकर संपलं पाहिजे, कारण जर ते जास्त काळ राहिलं तर ते नातं धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच पती-पत्नीमध्ये भावनिक जोड असणं खूप गरजेचं असल्याचे आई-वडिल सांगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व पुरुषांना हे माहित असेल की, आपल्या रागावलेल्या पत्नीचे मन वळवणे सोपे नसते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही रागावलेल्या पत्नीचा राग कसा घालवू शकता.


पत्नीचे मन वळवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा-


बायकोच्या नाराजीचे कारण शोधा


चांगल्या पतीचे हे पहिले लक्षण आहे की, त्याला माहित असावं की त्याच्या बायकोला कशाचा राग आला आहे? किंवा ती कशामुळे रागवली आहे. पत्नीच्या नाराजीचे कारण माहित नसले तरी आधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एकटे बसल्यावर बायकोशी बोला. तिचं ऐका, असे केल्याने पत्नीची नाराजी दूर होईल.


पत्नीला शांत होण्यासाठी वेळ द्या


धकाधकीच्या जीवनशैलीत काही वेळा घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना तणावामुळे बायकोला राग येऊ शकतो. जर बायको खूप रागावली असेल, तर तिला शांत होण्यासाठी वेळ द्या. तिच्या कोणत्याही प्रश्नाला लगेच रागवून उत्तर दिल्यास प्रकरण आणखी बिघडू शकतं. त्यामुळे तिला शांत होण्यासाठी वेळ द्या.


फुलं आणि भेटवस्तू द्या


महिलांना फुले आणि सरप्राईज गिफ्ट्स आवडतात. म्हणूनच रागावलेल्या बायकोला गिफ्ट्स देत राहा. ऑफिसमधून परतताना तुम्ही तुमच्या बायकोला एक सुंदर पुष्पगुच्छ देऊ शकता, असे केल्याने तुमच्या बायकोचा राग लगेच निघून जाईल. तसेच तिला फिरायला घेऊन जा.


खरेदी


खरेदी ही प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती असते. होय, वॉर्डरोबमध्ये कितीही कपडे असले तरी बाई शॉपिंग केल्याशिवाय राहू शकत नाही, जर तुमची बायको तुमच्यावर रागावली असेल तर तुम्ही तिला शॉपिंग करायला घेऊन जा. शॉपिंग करताना संधी बघून तिला सॉरी म्हणा. असे केल्याने पत्नीचा राग काही मिनिटांतच निघून जाईल.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)