तुम्ही खाताय तो बदाम अस्सल की बनावट? घरच्या घरी सहज ओळखा फरक
How to Recognise Fake Almonds: आपल्या शरीरासाठी बदाम फार उपयुक्त ठरते त्यातून बदाम खाण्याचे फायदेही चिक्कार आहेत. परंतु अनेकदा आपल्या ताटात बनावट बदामही पडू शकतात. तेव्हा अशावेळी आपल्या घाबरून जायचे नाहीये तर आपणही यापासून काळजी घेऊ शकतो.
How to Recognise Fake Almonds: सकाळी आपल्याला नाश्यात्यासाठी काहीतरी हटके हे लागतेच लागते त्यामुळे आपण आपल्या नाश्यात्याच्या आहारात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. पौष्टिक खाण्यावर सगळ्यांचा भर असतो. त्यातून आपल्याला सकाळी सकाळी बदाम खाण्याचेही अनेक फायदे असतात. आपल्याला माहितीच आहे की बदाम खाण्याचे अनेक फायदे असतात. त्यानं आपल्या शरीरालाही अनेक फायदे होतात. परंतु कधी कधी हे बदाम हे खराबही असू शकतात. तेव्हा अशावेळी या आपल्या पोटासाठी आणि त्याचसोबतच आपल्या आरोग्यासाठी मात्र हे फारच घातक ठरते. तेव्हा आपण खातो ते बदाम हे खरंच चांगले आहेत की नाही याची चाचपणी करणं हे महत्त्वाचे असते. कित्येकदा आपल्याला हे समजूनच येत नाही की आपण खात आहोत ते बदाम चांगले आहेत की नाही. त्यामुळे आपला बराच गोंधळ उडतो परंतु बदाम खराब झालेले नाही त्यातून ते खरे आहेत ना याची आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक असते.
असे अनेक पदार्थ असतात ज्यामध्ये भेसळ ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे अशा पदार्थांपासून सावध असणे फारच महत्त्वाचे असते. भाज्या, कडधान्यांपासून सगळ्यात भेसळ असल्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी योग्य ती काळजी घेणे ही आवश्यक असते. सुकामेव्यातही मोठ्या प्रमाणात भेसळ असून शकते. मध्यंतरी असाच एका व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात चक्क हिरव्या चण्यांमध्ये भेसळ केली जाते होती. चणांवर हिरवा रंग चढवून ते भाजवले जात होते त्यामुळे अशावेळी या व्हिडीओची चांगलीच चर्चा ही रंगलेली होती आणि त्यामुळे खाण्यातील सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला होता.सुकामेव्यातही ही भेसळ आढळू शकते आणि खासकरून ही भेसळ ही बदामांमध्येही आढळू शकते. जास्त करून यात विविध प्रकारे रंग आणि केमिकलही वापरले जाऊ शकतो.
हेही वाचा - हृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप
परंतु काळजी करू नका, ही भेसळ ओळखता येते आणि आपल्याला अशी बनावट बदामं खाण्यापासून आपला बचाव करता येतो. तेव्हा या लेखातून आपण सविस्तर जाणून घेऊया.
रंगावरून ओळखा - जर तुमचे बदाम हे बनावट आहेत तर तुमच्या समोर असलेल्या बदामांचा रंग हा नेहमीच्या बदामापेक्षा डार्क असतो. त्यातून याचा चवीवरही परिणाम होतो.
सालावरून ओळखा - जर का तुमच्या बदामाचे साल हे पटकनं निघत असेल तर समजा की तुमचे बदाम हे बनावट आहेत.
तेल निघतंय? - कागदावर घेऊन झाल्यावर बदामांतून जर का तेल निघत असेल तर समजा हे बदाम फेक आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)