Beer belly fat : अधिक प्रमाणात दारूचं सेवन शरिरासाठी घातक ठरतं. त्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर दारूचं अतिसेवन जीवावर देखील बेतू शकतं. दारूचे विविध प्रकार आहे. दारूचे प्रकार पेयात असलेल्या अल्कोहॉलच्या प्रमाणावर अवलंबून असते. जसं अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.


बिअर बेली म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिअर प्यायल्यानंतर अनेकांना पोट फुगल्याचा अनुभव येतो. याचं कारण म्हणजे बिअरच्या अतिरिक्त कॅलरीजमुळे पोटाभोवतीच्या अवयवांमध्ये व्हिसेरल फॅट..., त्यामुळे सतत बीयर पिणाऱ्यांना पोटाची चबरी वाढल्याचं जाणवतं. बिअरच्या अतिरिक्त कॅलरीजमधून मिळणाऱ्या पोटाला बिअर बेली म्हणतात. बिअर बेली म्हणजे पोटाभोवती चरबी जमा होणे. बिअर पिणाऱ्या अनेकांना याचा अनुभव येतो.


बिअर बेलीची कारणं काय आहेत?


जेव्हा पोटाभवती व्हिसेरल फॅट नावाची चरबी जमा होते. त्याला मेगन व्रो देखील म्हणतात. व्हिसेरल फॅट फक्त त्वचेखालीच नसतो, तर आतड्यात चरबी जमा होण्यास सुरूवात होते. बियर न  पिणाऱ्या व्यक्तीला देखील बियर बेली जाणवू शकते. जास्त प्रमाणात साखर,सोडा आणि कार्बोहाईड्रेडने देखील पोटाची चरबी वाढू शकते.


पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय-


जर तुम्ही जास्त प्रमाणात बिअरचे सेवन करत असाल तर स्वत:च्या भावनेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कमी प्रमाणात बिअरचे सेवन करण्याची गरज आहे. दररोज बिअर घेणे हे पुरूषांसाठी घातक ठरू शकते. बिअरमध्ये असे काही घटक असतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त भुक लागते. त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण करता.


फळे आणि भाज्यांचा आहारात नेहमी समावेश करावा. त्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे मिळतात. जे शरीरातील चरबी कमी करण्यास देखील मदत करतात. बिअरचं सेवन करणाऱ्या व्यक्तींनी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.


150 मिनिटं व्यायाम करा


व्यायाम हा प्रत्येकाच्या आयोग्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. दररोजच्या व्यायामामुळे शरीर सुदृढ राहतं. बिअर पिणाऱ्या लोकांनी कमीतकमी 150 मिनिटं व्यायाम करणं गरजेचे आहे. 30-30 मिनिटाच्या अंतराने तुम्ही व्यायाम करू शकता. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)