मुंबई : अनेकदा प्रेग्नेंसीनंतर पोट सुटते. त्याचबरोबर वाढलेले वजन कमी करणे महिलांना काहीसे कठीण होते. कारण बाळाच्या जन्मानंतर महिलांना शारीरिक अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे वजन कमी करण्याची घाई करु नका. किंवा कोणतीही औषधे घेऊ नका. कारण त्यामुळे बाळाच्या व तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होईल. त्याऐवजी काही सुरक्षित घरगुती उपाय पोट कमी करण्यास मदत करतील. हे उपाय आई व बाळ यांच्यासाठी सुरक्षित असून परिणामकारकही आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय...


मेथी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेथीचे दाणे पोट कमी करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर हार्मोन संतुलित राहतात. रात्री चमचाभर मेथीचे दाणे ग्लासभर पाण्यात उकळवा. पाणी कोमट झाल्यावर प्या. सुटलेले पोट लवकर कमी होण्यास मदत होईल.


स्तनपान अवश्य करा


अभ्यासानुसार, शरीरातील फॅट्स आणि कॅलरीज दोन्ही मिळून दूध तयार होते. त्यामुळे स्तनपान केल्याने काहीही न करता वजन कमी होण्यास मदत होते.


गरम पाणी प्या


प्रसुतीनंतर शक्यतो गरम पाणीच प्या. कारण गरम पाण्याने फक्त पोटच नाही तर वजनही कमी होण्यास मदत होईल.


पोट बांधून ठेवा


पोट गरम कपड्याने किंवा बेल्टने बांधून ठेवा. त्यामुळे पोट सामान्य आकारात येण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रसुतीनंतर उद्भवणारी पाठदुखीवरही आराम मिळेल.


लवंग आणि दालचिनी


प्रसुतीनंतर पोट कमी करण्यासाठी दालचिनी आणि लवंग खूप फायदेशीर ठरते. त्यासाठी २-३ लवंग आणि अर्धा चमचा दालचिनी पाण्यात उकळवून घ्या. ते पाणी थंड करुन प्या. पोट लवकरच कमी होईल.


ग्रीन टी


वजन कमी करण्यास ग्रीन टी अत्यंत लाभदायी आहे.  यात अॅँटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही. उलट वजन कमी होण्यास मदत होते. मात्र हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.