Sun Tan removing ideas : कडक उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाच्या झळा आता अधिक तीव्र जाणवू लागल्या आहेत. उन्हाळा कितीही कडक असला तरी आपल्याला घराबाहेर पडावंच लागतं. आता एवढ्या उन्हात घराबाहेर पडायचं म्हटलं की टॅनिंग हे होणारच. त्यामुळेच बरेच लोक टॅनिंगला खूप वैतागतात. बरेच लोक उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी क्रिम लावणं, स्कार्फ बांधणं यासारखे पर्याय अवलंबताना दिसत आहेत. पण, हाताच्या आणि पायांच्या सिंच काय ? याचा कोण विचार करतच नाही. त्याच्यावर देखील सुर्याच्या किरणांचा प्रभाव पडून ती स्किन टॅन होऊ लागते. (how to remove sun tan from skin home remedies in marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरं पायांना टॅनिंगपासून वाचवण्यासाठी आपण शूज घालू शकत नाही. कारण इतक्या उष्णतेमध्ये शूज घालणे देखील खूप कठीण आहे. मग जर अशा परिस्थीतीत चप्पल घातली तरी देखील स्किन टॅन होते. धूळ, माती आणि घामावर सन टॅनचा इतका खोल परिणाम होतो की, पाय काळे आणि घाणेरडे दिसू लागतात, आणि मग ते असे दिसतात कि जणू वर्षानुवर्षे आपण पाय धुतलेच नाहीत. (how to remove sun tan from skin home remedies in marathi )


याचा सामना करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय (sun tan removing ideas) सांगणार आहोत. जे तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून वाचवण्यासाठी मदत करु शकतात. 


या टीप्समुळे तुमच्या पायाचे टॅनिंग तर दूर होईलच शिवाय तुमचे पाय पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चमकू लागतील.


चला तर जाणून घेऊया हे घरगुती उपाय कोणते आहेत.


बेसन आणि दही


पायावरील उन्हाचा काळेपणा दूर करण्यासाठी ही टीप खूप प्रभावी आहे. दही आणि बेसन एकत्र मिक्स करून 15-20 मिनिटे पायाला लावून ठेवा आणि नंतर पाय धुवा. दही पायाला मॉइश्चरायझ करेल आणि टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन काम करेल. अधिक प्रभावासाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस देखील घालू शकता.


बटाटा आणि लिंबू


अर्धा बटाटा किसून त्याचा रस काढा आणि त्यात लिंबू पिळून घ्या. आता हा तयार रस 15 ते 20 मिनिटे पायावर ठेवल्यानंतर तो धुवा. यानंतर तुमच्या पायावर जी चमक येईल ती तुम्हाला आश्चर्यचकीत करेल.


ओट्स आणि दही


ओट्स बारीक करून त्यात दही मिसळा आणि पेस्ट तयार करा. त्यात तुम्ही लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकू शकता. हा तयार पॅक पायाला स्क्रब करा आणि 15 मिनिटे पायावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. पायांचा रंग लाईट झालेलं तुमच्या लगेच लक्षात येईल.


चंदन आणि मध


एका भांड्यात एक मोठा चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात एक चमचा मध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्हाला अर्धा तास पायांवर ठेवावी लागेल. चांगल्या परिणामासाठी तुम्ही ते आठवड्यातून दोनदा लागू करू शकता.


पपई आणि मध


पपई उन्हाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाते, परंतु, टॅनिंग दूर करण्यासाठी देखील ती खूप प्रभावी आहे. गरजेनुसार पपईची पेस्ट घ्या, त्यात अर्धा चमचा मध मिसळून काळ्या झालेल्या पायावर लावा. 20 ते 25 मिनिटांनी धुतल्यानंतर तुम्हाला पायातील टॅनिंग निघून गेलेली दिसेल.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)