हेयर स्ट्रेटनिंगनंतर केस गळणं किंवा खराब होऊ नयेत म्हणून या गोष्टी करा
तुम्हालाही हेयर स्ट्रेटनिंग करायची सवय? मग या गोष्टी न चुकता पाहाच
मुंबई : हेयर स्ट्रेटनिंग केल्यानंतर, लोकांचे केस अनेकदा कोरडे आणि खराब होऊ लागतात. ते आधी वळायला लागतात आणि त्यानंतर तुटायला लागतात. तुमच्या केसांना हायड्रेशनची गरज असते. तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर नुकसान होऊ शकतं. केसांची कशी काळजी घ्यायची याबद्दल आज जाणून घेऊया.
खराब केसांना काढून टाकण्यासाठी काही महिन्यांनी केस ट्रिम करणं आवश्यक असतं. त्यामुळे केस पटकन वाढतात. केसांची चांगली वाढ होण्यासाठी ते आवश्यक असतं. केसांना बाहेरची उत्पादनं सारखी बदलू नका. त्यामुळे त्रास होऊ शकतो.
सारखे केस धुण्यामुळे देखील ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस रफ होतात. आठवड्यातून दोनवेळा केस धुवायला हवेत. त्यापेक्षा जास्त केस धुतले तर त्वचा कोरडी होण्याचा धोका असतो. त्यामुळे कोंडा होऊ शकतो.
हेयर स्ट्रेटनिंग केल्यानंतर ते जास्त संवेदनशील होतात. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत उन्हात जाण्यापूर्वी केस मोकळे सोडू नका. पोहताना केस सोडू नका, कारण पाण्यातील क्लोरीन तुमच्या केसांना जास्त नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे तुम्हाला केस गळण्याची समस्या होऊ शकते.
तुमच्या केसांना सतत स्ट्रेटनिंग केल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते कायम उत्तम ठेवण्यासाठी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे केस चांगले राहतात. तर खराब झालेले केस निघून जातात. केस रूक्ष होत नाहीत. केसांना शाईन येते आणि हेल्दी राहतात.
(इथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. झी 24 तास कोणत्याही माहितीची खातरजमा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्या)