How To Stop Overthinking in Marathi: सध्या आपल्या सगळ्यांचे आयुष्य हे धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्यालाही आपल्या शारिरीक आरोग्यासोबत आपलं मानसिक आरोग्यही जपणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या मानसिक रोग हा तरूणांपासून ते वयस्कर माणसांपर्यतही होतो आहे. लहान मुलांमध्येही मानसिक आजारांची अनेकदा लक्षणं दिसून येऊ लागली आहेत. तेव्हा आपल्यालाही आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा आनंदी असणं आणि योग्य, स्वच्छ विचार करणं हे आपल्याला अशा मानसिक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला सकारात्मक विचारांचा पाया आपल्या दैनंदिन आयुष्यात उभा करणं अत्यंत गरजेचे असते. परंतु अनेकदा आपल्या मनात नको नको ते विचार येयला सुरूवात होते. त्यामुळे आपणही काहीबाही विचार करायला लागतो. यामध्ये मुख्यत्वे भीती आणि काळजीची लक्षणं असतात. उदाहरणार्थ, आपल्याला जर का आपल्याच बायकोची भीती वाटत असेल तर आपल्या मनात एखाद्या परिस्थितीला धरून पुढे नको नको ते विचार आपसूकच येयला लागतात. म्हणजे जर का तुमच्या बायकोनं तुम्हाला लवकरच येयला सांगितलं असेल आणि तुम्ही काही कारणास्तव उशिरा गेलात तर बायको काय म्हणेल, मग ती आपल्या काही बोलले का, आपल्याशी भांडणं करेल का, असे अवास्तव विचार येयला सुरूवात होते. 


हेही वाचा - प्राईड मन्थला सुरूवात, LGBTQIA+ याचा अर्थ काय असतो, जाणून घ्या


कधी कधी या विचारांची तीव्रता इतकी असते की, काहींना आपल्याला कोणीतरी मारेल की काय, किंवा आपण मरणार की काय इथपर्यंत वाईट विचार येऊ शकतात. कधी कधी लोकांना वेगळीच चिंता लागून राहिलेली असते. समजा, एका व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले असेल तर त्यालाही अशीच भीती किंवा काळजी वाटू लागते की आपलंही असंच होणार त्यामुळे ही व्यक्ती वेगळी वागायला बोलायला लागते. याची तीव्रता वाढून ही व्यक्ती मानसिक रूग्णही होऊ शकते. परंतु हे सगळे अवास्तव विचार असतात. तरूणांमध्ये वाढती स्पर्धा, बदलती जीवनशैली, आर्थिक ताण, रिलेशनशिप्स यांमुळे अशा विचारांचे प्रमाण अधिक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की या विचारांना नक्की आळा कसा घालायचा? 


  • आपल्या विचारांकडे लक्ष ठेवा. आपल्या आवडत्या व्यक्तीशी याबाबत मोकळेपणानं बोला. संवाद साधा. 

  • आपल्या पालकांना याबाबत विश्वासात घ्या.

  • असे विचार येऊ लागले तर त्यांना आव्हान द्या. उदाहरणार्थ जर का तुम्हाला असा विचार येत असेल की, आता मी ऑफिसला उशीर पोहचलो मग माझा बॉस मला काढून टाकेल, तर या विचाराला आव्हान द्या आणि म्हणा, तो का काढले, मी असं काय केलं आहे, मी उशीरा गेलो तर वाईट फार फार तर काय होईल? 

  • एका चांगल्या काउन्सेलरची मदत घ्या. 

  • आपल्या आहाराकडे लक्ष द्या. भरपूर पाणी प्या. 

  • प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांबद्दल वाचा. 

  • सकारात्मक विचार करा, कल्पनांवर बोला. माणसांबद्दल गॉसिप करू नका. 

  • योगा करा आणि ध्यानसाधना करा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)