मुंबई : पावसाळा हा जवळपास प्रत्येकालाच आवडतो. मात्र या सिझनमध्ये एक काळजी असते खासकरून महिलांना ती म्हणजे केसांची. वातावरणातील दमटपणामुळे पावसाळ्यात केसांचं नुकसान होतं. तसंच सतत पावसात भिजल्याने कोंडा आणि केसगळती अशा समस्या सुरु होतात. अशावेळी आपल्या केसांची काळजी नक्की कशी घ्यायची हा प्रश्न महिलांच्या मनात असतो. चला तर मग जाणून घेऊ.


केस ओलसर ठेऊ नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाचे दिवस सुरु झाले असून केस भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. केस भिजले तरी लगेच कोमट पाण्याने धुऊन घ्या. कारण पावसाच्या पाण्यामुळे केसात बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते.


हेअर स्टाईलिंगचे प्रोडक्ट कमी वापरा


या दिवसांत हेअर स्टाइल करण्यासाठी हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर करणं शक्यतो टाळावं. यामध्ये केमिकल्स भरपूर असतात. यांच्या वापराने केस चिकट होण्याची शक्यता असते.


केमिकल-फ्री शॅम्पूचा वापर


पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होऊ शकतात. यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुण्यासाठी हर्बल शॅम्पू वापरावा. त्याचसोबत माईल्ड क्रीमयुक्त शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा.


केस हळुवार विंचरा


पावसाळ्यात केस फणीने विंचरताना खूप काळजी घ्यावी. यावेळी मोठ्या दाताच्या कंगव्याने हळुवारपणे केस विंचरावे. जेणेकरून जास्त केस तुटणार नाहीत.