मुंबई : पावसाळ्यात एकीकडे वातावरण अल्हाददायक असते तर दुसरीकडे त्यामधून अनेक आजारांची साथ वाढत असते. अस्वच्छतेमुळे डासांची पैदास होऊन डेंगी, मलेरियाची साथ पसरते. तर साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे फंगल इंफेक्शन, खाज येणं असे त्रासही वाढतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये दमटपणा अधिक असल्याने त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येतो. त्वचेवर घाम, तेल एकत्र मिसळल्याने काही त्वचाविकार अधिक बळावतात.  महिलांमध्ये पावसाळ्यात त्वचा विकार अधिक वाढतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना भान ठेवा. 


पावसाळ्याच्या दिवसात उन पावसाचा खेळ सुरू असतो. अशावेळेस त्वचा अधिक संवेदनशील होते. त्यामुळे पावसात भिजू नका. तुमच्याजवळ छत्री हमखास ठेवा. 


पावसात भिजल्यानंतर  अंगावरचे ओले कपडे तात्काळ बदला. पावसात भिजल्यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवा आणि नीट कोरडी करा. 


त्वचेवर इंफेक्शन झाल्यास अ‍ॅन्टी फंगल पावडरचा वापर करा. त्वचा शक्य तितकी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. ओले कपडे घालू नका. शूजदेखील ओले वापरू नका. पुन्हा वापरताना ते योग्यरित्या कोरडे करावेत.  पावसात भिजलेले शूज झटपट सुकवणार्‍या 4 खास ट्रिक्स


या लहान सहान वाटणार्‍या परंतू महत्त्वाच्या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या. यामधूनच इंफेक्शनचा धोका बळावतो.