Heart Problems: सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वाढत आहेत. हृदय निरोगी राखणं महत्वाचं आहे कारण ते तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे कार्य करते. ते आपले अवयव आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. जर तुमचे हृदय योग्यरित्या कार्य करू शकत नसेल तर तुमच्या अवयवांना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळणार नाहीत. याचा तुमच्या एकूण आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि मृत्यू देखील ओढावू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीतील MD, DM Interventional Cardiologist डॉ. गजानन गावंडे-पाटील म्हणाले, कमकुवत हृदय असलेल्या व्यक्तीला हार्ट फेल्युअर, मूत्रपिंड खराब होणं किंवा निकामी होणं, यकृताचं नुकसान होणं, अनियमित हृदयाचे ठोके, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या झडपांचे रोग आणि थायरॉईड विकार यांसारख्या आरोग्य परिस्थिती विकसित होण्याची शक्यता असते. म्हणूनच जीवनाची गुणवत्ता आणि आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या हृदयाचे आरोग्य प्रभावीपणे व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. 


हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ही खबरदारी घ्या


आहारातील मीठाच्या सेवनावर मर्यादा राखा


आहारात मीठाचे अतिरिक्त सेवन हे तुमच्या हृदयासाठी हानिकारक असू शकते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका लक्षणीय वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना कायमचे नुकसान होऊ शकते आणि हे तुमचा रक्त प्रवाह रोखू शकतो ज्यामुळे तुमच्या हृदयाला रक्त पंप करणे कठीण होऊ शकते.


संतुलित आहार घ्या


रोजच्या आहारात भाज्या, फळे, कडधान्ये, स्प्राउट्स आणि उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. जीवनसत्त्वे, खनिजे, चांगले फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असलेले संतुलित अन्न खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल. सॅच्युरेटेड फॅट्स, सोडियमयुक्त, साखर आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळा.


एक्टिव्ह लाईफस्टाईल पाळा 


शारीरिक हालचाली आणि व्यायाम हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. जॉगिंग, योगा, ध्यान, पोहणे, सायकल चालवणे, चालणे, कार्डिओ आणि जिममध्ये कमीत कमी 45 मिनिटे व्यायाम करणे यासारख्या शारीरिक क्रियांमध्ये व्यस्त रहा. हे तुमच्या हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यात मदत करते आणि तुमचे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.


तणावाचे व्यवस्थापन करा


जास्त ताण तुमच्या हृदयासाठी हानिकारक असू शकतो. तणावामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते ज्यामुळे ॲड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल हार्मोन्स बाहेर पडतात जे तुमच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा अधिक वेगाने वाढवतात. यामुळे रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स  (Wadhane) यासारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम तणाव-व्यवस्थापन, मन आणि हृदय शांत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.