मुंबई : आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना महत्त्वाचे स्थान असते. चांगले, वाईट नातेसंबंध आयुष्यावर परिणाम घडवतात. या सगळ्याच कळत नकळत परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. हेल्दी, आनंदी नाते आत्मविश्वास वाढवते तर अनहेल्दी नाते चिंता, काळजीत टाकते. प्रत्येक नात्यात काही ना काही समस्या असतात. पण आपल्या परिने त्यावर मात करणे शिकायला हवे. अन्यथा या समस्यांना समोरे जावे लागेल. पहा कोणत्या आहेत त्या समस्या...


वजन वाढणे:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर स्थिरावल्यानंतर वजन वाढू लागतं आणि लग्नानंतर नात्यात काही समस्या आल्यास वजन कमी होऊ लागते. नात्यात आनंदी आणि समाधानी नसल्यास चिडचिड वाढते, झोप लागत नाही. परिणामी वजन वाढू लागते.


ताण:


जे लोक नियमित सेक्स करतात ते मानसिकरीत्या हेल्दी राहतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक न झाल्यास किंवा सेक्स न केल्यास ताण वाढू शकतो. 


चिंता:


नात्यातील समस्या अनेकांना चिंतेत टाकतात. नात्यातील समस्या आणि generalised anxiety disorder याचा संबंध आहे. 


नैराश्य:


चिंता वाढली की नैराश्य येते. म्हणून नात्यातील वाईट अनुभवांमुळे किंवा समस्यांमुळे नैराश्य वाढते. नात्यातील समस्यांमुळे स्त्री ही पुरुषापेक्षा सहापट अधिक डिप्रेस्ड होते.


उच्च रक्तदाब:


ताण आणि आहार याचा रक्तदाबावर परिणाम होतो. तसंच नात्यातील चढ-उतार रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरतात. ज्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी नाही त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.


अल्कोहोलचे सेवन वाढते:


तुमचे पार्टनरसोबतचे नाते कसे आहे, याचा परिणाम अल्कोहोलच्या सेवनावर होते. जवळीकतेचा अभाव, भांडणं यामुळे लोक व्यसनाधीन होतात.