मुंबई :  स्त्रीयांना आपल्या ब्रेस्टबाबत अनेकदा चुकीची माहिती असते. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. स्त्रीयांचे ब्रेस्ट पुरूषांचं आकर्षण असल्याचं म्हटलं जातं. ही एक नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे अनेक स्त्रीया आपल्या ब्रेस्टबाबतीत सतर्क असतात. ब्रेस्टची साईज कमी जास्त असणं ही स्वाभाविक आणि नैसर्गिक सुद्धा असतं. तरी ब्रेस्टची साईज कमी जास्त असणे आणि ब्रेस्ट कॅन्सर बाबत स्त्रीयांमध्ये संभ्रम असतो. जाणून घेऊ य़ा या लेखातून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ब्रेस्टच्या साईज कमी जास्त असू शकतात. ब्रेस्ट इच्छित साईजचे नसतील तर चिंता करण्याचं कारण नाही. ही सामान्य बाब आहे. बहुतांश महिलांमध्ये डावा ब्रेस्ट उजव्या ब्रेस्ट पेक्षा किंचित मोठा असू शकतो. 



जर तुम्ही रात्री झोपताना एकाच कुशीवर झोपत असाल तर यामुळे तुमची ब्रेस्ट साईज बिघडू शकते. एकाच बाजूने झोपणं लगेच बंद करा. त्यामुळे एकाबाजूचा ब्रेस्ट दाबला जातो.



जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर हे हे अजिबात योग्य नाही. यामुळे तुम्ही ब्रा घालता की नाही याला अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रास किंवा नुकसानीपासून वाचायचे असल्यास ब्रेस्ट खाली एखादी मुलायम उशी ठेवा. एका बाजूने झोपनार असाल तर, उशीमुळे ब्रेस्टला आधार मिळेल.



स्त्रीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसून येते. ब्रेस्टमध्ये होणारे प्रत्येक बदल घातक किंवा कॅन्सरचे नसतात. जर तुम्हाला ब्रेस्टमध्ये कोणती गाठ दिसत असेल तर घाबरू नका. काही गाठी अगदी तात्पुरत्या असतात. काही वेळा मासिक पाळीच्या दिवसांमध्येदेखील असे दिसून येते. जर ब्रेस्टमध्ये जास्त दिवस सूज आली असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्यावे.