थकलेल्या पत्नीने सेक्ससाठी नकार दिला तर...; हेल्थ सर्व्हेमध्ये 66 टक्के पुरुषांनी नोंदवलं धक्कादायक मत!
National Family Health Survey : सर्व्हेमध्ये भारतीय लोकांना शारीरिक संबंधांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पुरुषांचा स्वभाव यासंदर्भात बदलत असल्याचं समोर आलंय. पुरुषांच्या म्हणण्यानुसार, महिला ही सेक्सची मशीन नाही. त्यामुळे तिची इच्छा नसल्यास शारीरिक संबंध बनवणं योग्य नाही.
National Family Health Survey : भारताच्या आरोग्य मंत्रालयाने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ( National Family Health Survey ) नुकताच केला. दरम्यान या सर्व्हेक्षणातून काही धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. या सर्व्हेमध्ये भारतीय लोकांना शारीरिक संबंधांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पुरुषांचा स्वभाव यासंदर्भात बदलत असल्याचं समोर आलंय. पुरुषांच्या म्हणण्यानुसार, महिला ही सेक्सची मशीन नाही. त्यामुळे तिची इच्छा नसल्यास शारीरिक संबंध बनवणं योग्य नाही.
नुकताच आरोग्य मंत्रालयाने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ( National Family Health Survey ) केला. या सर्व्हेक्षणात 66 टक्के पुरुषांनी सांगितलं की जर पत्नी थकली असेल आणि ती सेक्स करण्यासाठी नकार देत असेल तर त्यामध्ये काहीही चूक नाहीये. तर 80 टक्के महिलांच्या म्हणण्यानुसार, महिला थकल्या असताना पुरुषांनी सेक्ससाठी दबाव आणू नये.
या सर्व्हेतून ( National Family Health Survey ) समोर आलेल्या बाबीनुसार, 8 टक्के महिला आणि 10 टक्के पुरुषांचं असं मत आहे की, जर पत्नी थकली असेल, पती कोणत्या सेक्सुअली ट्रांसमीटेड डिजीजने ग्रस्त असेल आणि पतीने कोणत्या इतर महिलेसोबत संबंध असले, तरीही या 3 कारणांमुळे पत्नीने पतीला सेक्ससाठी नाकारू नये. पाचपैकी चार पेक्षा जास्त स्त्रिया (82 टक्के) त्यांच्या पतींना लैंगिक संबंध ठेवायचे नसल्यास त्यांना नाही म्हणू शकतात. गोव्यात (92 टक्के) स्त्रिया नाही म्हणू शकतील. तर अरुणाचल प्रदेश (63 टक्के) आणि जम्मू आणि काश्मीर (65 टक्के) मध्ये नाही म्हणू शकतील.
सेक्सबाबत पुरुषांचं मत काय?
या सर्व्हेक्षणादरम्यान पुरुषांना विचारण्यात आलं की, त्यांना चार मार्गांनी वागण्याचा अधिकार आहे का, जसं की रागावणं, त्यांच्या पत्नीला मारणं, पत्नीला पैसे नाकारणे किंवा आर्थिक मदतीचे इतर मार्ग. यावेळी पत्नीविरुद्ध बळाचा वापर करून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणं किंवा दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवणं.
यावेळी 15-49 वयोगटातील केवळ 6 टक्के पुरुष सहमत होते की, जर पत्नीने लैंगिक संबंध नाकारले तर पुरुषांना या चारही प्रकारे वागण्याचा अधिकार आहे. तर 72 टक्के लोकांनी कोणत्याही वर्तनाशी सहमत नसल्याचं मत व्यक्त केलं. याशिवाय 19 टक्के पुरुष सहमत आहेत की, पत्नीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास पतीला राग येण्याचा तसंच फटकारण्याचा अधिकार आहे.