मुतखडा असल्यास काय खाऊ नये : मुतखड्यामुळे व्यक्तीला अत्यंत वेदनादायी परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांनी अशा गोष्टींचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे हा त्रास दूर होतो. पण अनेकदा लोक माहितीच्या अभावी असे काही पदार्थ खातात, ज्यामुळे मुतखड्याची समस्या आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत असे पदार्थ खाणे टाळावे. लोकांना या पदार्थांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्हाला मुतखडा झाला असल्यास कोणते पदार्थ खाऊ नयेत. (If you are eating these foods after kidney stone nz)


आणखी वाचा - ठरवून ही सकाळी उठता येत नाही...तर फॉलो करा 'या' टिप्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



मुतखडा (Kidney Stone) झाल्यावर काय खाऊ नये -


1. खारट पदार्थांचे सेवन अगदी कमी करावे. कारण खारट पदार्थांमध्ये सोडियम आढळते ज्यामुळे मुतखड्याचा धोका आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकबंद फूड यापासून जितकं शक्य होईल तितकं दूर राहावे.


2. मुतखड्याची समस्या असल्यास, खजूर आणि रास्पबेरीसारख्या फळांचे सेवन टाळावे. त्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण आढळते.


3. प्रथिने जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात यूरिक अॅसिड तयार होऊ लागते. कॅल्शियम ऑक्सलेट सोबतच, युरिक ऍसिडमुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आहारात  मांसाहाराच्या मदतीने प्रथिने घेत असाल तर शरीरात तयार होणारे यूरिक अॅसिड मुतखड्याचा धोका वाढवू शकतो.


आणखी वाचा - उपाशी पोटी अंडी खाल्यास 'हे' होतील फायदे... जाणून घ्या


 


 


4. काही भाज्यांचे सेवन केल्यानेही किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. पालक, बटाटा, बीटरूट आणि गाजर यांसारख्या भाज्यांचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये आढळणाऱ्या ऑक्सॅलेट्समुळे मुतखड्यांचा धोका अधिक वाढू शकतो.


मुतखडा झाल्यास वरीलपैकी काही पदार्थ खाऊ नयेत. त्याचबरोबर योग्य आहार घ्यावा. दररोज 15 ते 20 मिनिटे व्यायाम करावा. लवकरच तुम्हाला त्यातून बरं वाटेल. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)